साधी गवारीची भाजी खाऊन कंटाळला असाल तर, ही गवार ढोकळी करुन बघा. अगदीच चविष्ट लागते. झटपट होते आणि नुसती खाल्ली तरी छान लागते. पाहा अगदी सोपी रेसिपी. (Have you ever eaten guwar dhokli? easy to make - tastes amazing)इतरही अनेक प्रकारे हा पदार्थ केला जातो. त्यापैकीच एक पद्धत कशी आहे ते जाणून घ्या.
साहित्य(Have you ever eaten guwar dhokli? easy to make - tastes amazing)
गवार, पाणी, बेसन, लाल तिखट, गूळ, लसूण, आलं, जिरे, मोहरी, तेल, कोथिंबीर, हळद, हिंग, मीठ
कृती
१. मस्त ताजी गवारीची भाजी वापरा. भाजी छान स्वच्छ धुऊन घ्या. मध्यम आकारामध्ये गवार मोडून घ्या.
२. एका परातीमध्ये बेसनाचे पीठ घ्या. त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला. तसेच हळद घाला. छान बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. काही जण बेसनामध्ये पांढरे तीळही घालतात. त्यामध्ये कोमट केलेले तेल घाला. सगळं व्यवस्थित मिक्स करुन घ्या. मग त्यामध्ये हळूहळू पाणी घाला आणि पीठ मळून घ्या. अति घट्टही नको आणि अति पातळही नको. पुरीसाठी जसे पीठ मळता तसे पीठ मळा. त्या पीठाच्या गोल ढोकळी करुन घ्या. ढोकळी म्हणजे लाट्याच. पुरीसाठी ज्या आकाराच्या लाट्या करता तशाच लाट्या करायच्या.
३. एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घ्या. तेल जरा तापले की त्यामध्ये मोहरी घाला. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे घाला. हिंगही घाला. लसणाच्या पाकळ्या घाला. किसलेलं आलं घाला. सगळं छान परतून घ्या. मग त्यामध्ये गवारीचे तुकडे घाला आणि व्यवस्थित परतून घ्या. चवीनुसार मीठ घाला झाकून ठेवा आणि गवार छान शिजू द्या.
४. गवार जरा शिजली की त्यामध्ये पाणी घाला थोडा गूळ घाला. हळद व लाल तिखट घाला. आणि तयार केलेल्या बेसनाच्या लाट्या म्हणजेच ढोकळी त्यामध्ये घाला. भाजी नीट ढवळा आणि झाकून ठेवा. मग व्यवस्थित वाफ काढून घ्या. ढोकळी जरा मऊ झाली आणि भाजी जरा घट्ट झाली की गॅस बंद करा. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. भात, चपाती, भाकरी सगळ्याशीच ही भाजी छान लागते.