पिवळे पोहे नाश्त्याला खातोच. तसेच पांढरे पोहेही चवीला छान लागतात. मात्र कधी हिरवे पोहे खाल्ले आहेत का? मस्त स्पेशल रेसिपी आहे. (Have you ever eaten green poha? A very special breakfast recipe)एकदा नक्की करुन पाहा. खास चटणी कशी करायची त्याची रेसिपी पाहा. नाश्त्याला असे पोहे करा सगळ्यांनाच आवडतील.
साहित्यपोहे, मटार, तेल, जिरे, मोहरी, कांदा, शेंगदाणे, कडीपत्ता, हळद, लिंबाचा रस, कोथिंबीर, पुदिना, हिरवा मिरची, पाणी, मीठ
कृती१. एका मिक्सरच्या भांड्यात थोडे मटार घ्यायचे. मटार स्वच्छ धुवायचे मगच घ्यायचे. त्यात थोडी कोथिंबीर घालायची. हिरव्या मिरचीचे थोडे तुकडे घ्यायचे. (Have you ever eaten green poha? A very special breakfast recipe)चमचाभर जिरे घ्यायचे. काही पुदिन्याची ताजी पाने घ्यायची. कडीपत्ता घ्यायचा आणि त्यात थोडे पाणी घालायचे. छान वाटून घ्यायचे. हिरवी चटणी तयार करुन घ्यायची.
२. एका जाळीत पोहे घ्यायचे. पोहे दोन ते तीनदा धुवायचे. मग जाळीतर पसरवून सुकत ठेवायचे. साध्या पोह्यांसाठी जसे पोहे धुता आणि सुकवता अगदी तसेच करायचे.
३. कढई गरम करत ठेवायची. कढीत थोडे तेल घालायचे. तेल जरा गरम झाल्यावर त्यात चमचाभर जिरे घालायचे. जिरे छान फुलल्यावर त्यात चमचाभर मोहरी घालायची. जिरे आणि मोहरी छान परतून घ्यायची. मग त्यात कडीपत्याची ताजी पाने घालायची. कडीपत्ता तडतडू द्यायचा. त्यात थोडे शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे जरा परतल्यावर त्यात कांदा घालायचा. कांदा छान गुलाबी परतायचा. मग त्यात मटारचे दाणे घालायचे आणि सगळे पदार्थ छान परतायचे. मटारचे दाणे जरा उकळून मग घाला.
४. त्यात चमचाभर हळद घालायची. तसेच चवी पुरते मीठ घालायचे. सगळं छान ढवळायचं आणि मग त्यात तयार केलेलं वाटण घालायचं. वाटण छान परतायचे. जरा आटू द्याचे. कांदा आणि इतर पदार्थ त्यात एकरुप होऊ द्यायचे. दोन ते पाच मिनिटे परतायचे. मग त्यात पोहे घालायचे. पोहे छान ढवळायचे. वरतून लिंबाचा रस पिळायचा आणि छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. सगळं छान ढवळायचं.