सफरचंद हे फळ फार पौष्टिक असते. चवीलाही सफरचंद मस्त असते. छान गोड लागते. लहान मुलांनाही सफरचंद आवडते. इतर फळे खायला जरी मुलांनी नखरे केले तरी, सफरचंद बरेच जण आवडीने खातात. (Have you ever eaten apple chuunda? A sweet and juicy treat )असे म्हटले जाते, रोज एक सफरचंद खाल्ले तर आजारपण येणारच नाही. सफरचंदामध्ये अनेक जीवनसत्वे असतात. तसेच खनिजे असतात. आपल्याकडे सफरचंदाचे काही पदार्थ तयार केले जातात. चवीला छान गोड असे हे पदार्थ असतात. अ(Have you ever eaten apple chuunda? A sweet and juicy treat )साच एक गोड पदार्थ म्हणजे सफरचंदाचा छुंदा.
तयार करायला अगदीच सोपी रेसिपी आहे. आठवडाभर नक्कीच टिकतो. पोळीबरोबर खाऊ शकता. नुसता तोंडी लावायला घेऊ शकता. ब्रेडला लाऊन खा. कसाही खाल्लात तरी छानच लागतो. तेजस्वी प्रकाशने ही रेसिपी शेअर केल्यानंतर लोकांना हा छुंदा फार आवडला.
साहित्यसफरचंद, तूप, बडीशेप, मीठ, लाल तिखट, गूळ, लिंबू ,जिरे पूड
कृती१. सफरचंद सोलून घ्या. सफरचंदाच्या मधला भाग काढून घ्या. बिया काढून घ्या. मग त्याचे बारीक तुकडे करून घ्या. ते तुकडे स्वच्छ धुऊन घ्या.(Have you ever eaten apple chuunda? A sweet and juicy treat )२. एका पॅनमध्ये चमचाभर तूप घ्या. तूप जरा गरम झाले की त्यामध्ये जिरे घाला. जिरं तडतडलं की मग त्यामध्ये बडीशेप घाला. छान परतून घ्या. बडीशेपेचा वास यायला लागला की त्यामध्ये सफरचंदाचे तुकडे घाला.