Lokmat Sakhi >Food > सफरचंदाचा छुंदा कधी खाल्लाच नाही? जिभेवर ठेवताच विरघळणारा गोड रसरशीत पदार्थ, पाहा रेसिपी

सफरचंदाचा छुंदा कधी खाल्लाच नाही? जिभेवर ठेवताच विरघळणारा गोड रसरशीत पदार्थ, पाहा रेसिपी

Have you ever eaten apple chuunda? A sweet and juicy treat : सफरचंदाचा छुंदा तयार करायला अगदीच सोपा आणि चवीला छान चमचमीत लागतो. पाहा रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2025 19:17 IST2025-04-07T19:16:15+5:302025-04-07T19:17:28+5:30

Have you ever eaten apple chuunda? A sweet and juicy treat : सफरचंदाचा छुंदा तयार करायला अगदीच सोपा आणि चवीला छान चमचमीत लागतो. पाहा रेसिपी.

Have you ever eaten apple chuunda? A sweet and juicy treat | सफरचंदाचा छुंदा कधी खाल्लाच नाही? जिभेवर ठेवताच विरघळणारा गोड रसरशीत पदार्थ, पाहा रेसिपी

सफरचंदाचा छुंदा कधी खाल्लाच नाही? जिभेवर ठेवताच विरघळणारा गोड रसरशीत पदार्थ, पाहा रेसिपी

सफरचंद हे फळ फार पौष्टिक असते. चवीलाही सफरचंद मस्त असते. छान गोड लागते. लहान मुलांनाही सफरचंद आवडते. इतर फळे खायला जरी मुलांनी नखरे केले तरी, सफरचंद बरेच जण आवडीने खातात. (Have you ever eaten apple chuunda? A sweet and juicy treat )असे म्हटले जाते, रोज एक सफरचंद खाल्ले तर आजारपण येणारच नाही. सफरचंदामध्ये अनेक जीवनसत्वे असतात. तसेच खनिजे असतात. आपल्याकडे सफरचंदाचे काही पदार्थ तयार केले जातात. चवीला छान गोड असे हे पदार्थ असतात. अ(Have you ever eaten apple chuunda? A sweet and juicy treat )साच एक गोड पदार्थ म्हणजे सफरचंदाचा छुंदा.

तयार करायला अगदीच सोपी रेसिपी आहे. आठवडाभर नक्कीच टिकतो. पोळीबरोबर खाऊ शकता. नुसता तोंडी लावायला घेऊ शकता. ब्रेडला लाऊन खा. कसाही खाल्लात तरी छानच लागतो. तेजस्वी प्रकाशने ही रेसिपी शेअर केल्यानंतर लोकांना हा छुंदा फार आवडला.

साहित्य
सफरचंद, तूप, बडीशेप, मीठ, लाल तिखट, गूळ, लिंबू ,जिरे पूड

कृती
१. सफरचंद सोलून घ्या. सफरचंदाच्या मधला भाग काढून घ्या. बिया काढून घ्या. मग त्याचे बारीक तुकडे करून घ्या. ते तुकडे स्वच्छ धुऊन घ्या.(Have you ever eaten apple chuunda? A sweet and juicy treat )
२. एका पॅनमध्ये चमचाभर तूप घ्या. तूप जरा गरम झाले की त्यामध्ये जिरे घाला. जिरं तडतडलं की मग त्यामध्ये बडीशेप घाला. छान परतून घ्या. बडीशेपेचा वास यायला लागला की त्यामध्ये सफरचंदाचे तुकडे घाला. 


३. सफरचंद शिजून मऊ होईपर्यंत परता. नंतर त्यामध्ये चमचाभर लाल तिखट घाला. पुन्हा छान परतून घ्या. सफरचंद पूर्णपणे मऊ करून घ्यायचे. 
४. सफरचंद मऊ झाल्यावर चमच्याने किंवा स्मॅशरने कुसकरुन घ्यायचे. त्याचा लगदा करून घ्यायचा. नंतर त्यामध्ये वाटीभर गूळ घाला. गूळ व्यवस्थित किसून घ्या. त्यामध्ये अख्खे खडे राहणार नाहीत याची काळजी घ्या. गूळ विरघळायला जरा वेळ लागतो. त्यामुळे गूळ व सफरचंद एकजीव होईपर्यंत ढवळत राहा. 


५. काही मिनिटांमध्ये त्या मिश्रणाला पाणी सुटायला लागेल. मग त्यामध्ये थोडा लिंबाचा रस पिळा. सगळं छान एकजीव करून घ्या. लाल रंगाचा मऊ छुंदा तयार झाला की, गॅस बंद करा. छुंदा गार करत ठेवा. व्यवस्थित गार झाल्यावर एका हवाबंद डब्यात काढा आणि फ्रीजमध्ये ठेवा. बाहेर राहीला तर खराब होईल.  

Web Title: Have you ever eaten apple chuunda? A sweet and juicy treat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.