शरीराला अनेक पोषक आवश्यक असतात (Health Tips). ज्यात प्रोटीनचाही समावेश आहे. प्रोटीन रिच फूड खाण्याचे अनेक फायदे आहेत (Protein Rich Laddoo). प्रोटीन लहानग्यांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आवश्यक आहे (Food). प्रोटीन फक्त मसल्ससाठी नसून, केस, डोळे आणि हार्मोन्सच्या कार्यासाठीही आवश्यक आहे (Kitchen Tips). व्यायाम करणाऱ्या लोकांना प्रोटीनची पुरेपूर गरज असते. त्यामुळे ते अधिक प्रोटीन रिच फूड खातात.
जर शरीरातील प्रोटीनची गरज भागवायची असेल तर, चण्याचा प्रोटीन रिच लाडू तयार करा. अनेकदा प्रोटीन रिच पदार्थ महाग असतात. जर आपल्याला स्वस्तात मस्त प्रोटीन रिच पदार्थ खायचं असेल तर, झटपट घरातच भाजलेल्या चण्याचे लाडू तयार करा. हा लाडू कमी खर्चात झटपट तयार होतो. यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. भाजलेल्या चण्याचे झटपट लाडू कसे तयार करायचे? पाहा(Have This Protein And Vitamin Ladoo Every Day For Healthy Bones).
प्रोटीन रिच लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य
भाजलेली चणा डाळ
तूप
भोपळ्याच्या बिया
अळशीच्या बिया
सूर्यफुलाच्या बिया
मासिक पाळी वेळेवर येत नाही? कधी लवकर तर कधी २-३ महिन्यांनी येते? ४ टिप्स; त्रास होईल कायमचा दूर
चिया सीड्स
ओट्स
काजू
बदाम
अशा पद्धतीने तयार करा प्रोटीन रिच लाडू
सर्वात आधी मिक्सरचं भांडं घ्या. त्यात १ कप भाजलेले चणे घालून बारीक पावडर तयार करा. एक कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात चमचाभर तूप घाला. जर आपल्याला जास्त तूप आवडत असेल तर, आणखीन एक चमचा तूप आपण घालू शकता. तूप गरम झाल्यानंतर त्यात भाजलेल्या चणा डाळीची पावडर घालून भाजून घ्या.
मंद आचेवर भाजून घेतल्यानंतर त्यात एक कप गुळ घाला. दुसरीकडे एक पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक वाटी भोपळ्याच्या बिया, अळशीच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, चिया सीड्स, काजू आणि बदाम घालून भाजून घ्या. नंतर ओट्स घालून भाजून घ्या.
ब्रेकअप झालं तरीही एक्स पार्टनर तुमचा पाठलाग करतो? ' ऑर्बिटिंग' नावाचा नवा त्रास, पाहा त्याचा अर्थ
भाजलेल्या बिया आणि ओट्स मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्या. तयार पावडर मिश्रणात घालून चमच्याने मिक्स करा. नंतर २ चमचे पांढरे तीळ घालून मिक्स करा. हाताला थोडे तूप लावा. थोडे मिश्रण घ्या, आणि लाडू वळवून घ्या. अशा प्रकारे प्रोटीन रिच लाडू खाण्यासाठी रेडी.