Lokmat Sakhi >Food > पुदिना ताक प्या, पचनाची समस्या छळणार नाही! पाहा पुदिना ताक रेसिपी आणि फायदे

पुदिना ताक प्या, पचनाची समस्या छळणार नाही! पाहा पुदिना ताक रेसिपी आणि फायदे

have digestion problems? Drink mint buttermilk, See recipe and benefits : पुदिना घातलेले ताक उन्हाळ्यात रोज प्या. फायदेच फायदे आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2025 17:20 IST2025-05-13T17:19:12+5:302025-05-13T17:20:05+5:30

have digestion problems? Drink mint buttermilk, See recipe and benefits : पुदिना घातलेले ताक उन्हाळ्यात रोज प्या. फायदेच फायदे आहेत.

have digestion problems? Drink mint buttermilk, See recipe and benefits | पुदिना ताक प्या, पचनाची समस्या छळणार नाही! पाहा पुदिना ताक रेसिपी आणि फायदे

पुदिना ताक प्या, पचनाची समस्या छळणार नाही! पाहा पुदिना ताक रेसिपी आणि फायदे

जेवणानंतर ताक प्यायची पद्धत आपल्याकडे वर्षानुवर्षे आहे. उन्हाळ्यात तर फक्त जेवणानंतर नाही तर इतरही वेळी ताक प्यावे. (have digestion problems? Drink mint buttermilk See, recipe and benefits)शरीराला गरजेचा असलेला थंडावा ताकातून मिळतो. ताकात आपण हिंग घालतो. मीठ घालतो. मठ्ठा करतो तसेच फोडणीचे ताकही पितो. मात्र पुदिना ताक पिणे आरोग्यासाठी फार फायद्याचे ठरते. 

पुदिना पचनासाठी चांगला असतो. ताकही पचनासाठी फार उपयुक्त असते. ताकातील प्रोबायोटिक्स आणि पुदिन्यातील प्रोस्टाग्लँडिन्स यांचे संयोजन झाल्यावर ताकाची पौष्टिकता वाढते. (have digestion problems? Drink mint buttermilk See, recipe and benefits)रचनासाठी ते फारच उपयुक्त ठरते. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुदिना ताक पिणे गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठीही हे पेय उपयुक्त ठरते. पुदिन्यातही कॅलरिज कमी असतात तसेच दह्यातही कमीच असतात. पुदिना ताक चवीलाही अगदी छान असते. रोज एक ग्लास असे ताक प्यावे. पुदिन्याचा मसाला एकदा करुन ठेवला की किमान १५ दिवस तरी टिकतोच. फ्रिजमध्ये ठेवायचा.     


साहित्य
दही, पाणी, पुदिना, चाट मसाला, जिरे पूड, सैंधव मीठ, हिरवी मिरची, आलं, हिंग, कोथिंबीर 

कृती
१. कोथिंबीर निवडून घ्यायची. स्वच्छ धुऊन घ्यायची. बारीक चिरुन घ्या. पुदिनाही निवडून घ्यायचा. छान ताजा पुदिना घ्या. पाने स्वच्छ धुवायची. 

२. मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याची पाने घ्यायची. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. आल्याचा तुकडा घालायचा आणि थोडे पाणी घालायचे. व्यवस्थित वाटून घ्या. सगळे छान वाटले जाईल याची काळजी घ्या. घट्ट पेस्ट तयार करुन घ्या. 

३. एका खोलगट पातेल्यात दही घ्यायचे. दही छान गोडच वापरा आंबट नको. दही व्यवस्थित घुसळून घ्या. मग त्यात चमचाभर चाट मसाला घाला. जिरे पूड घाला. सैंधव मीठ घाला. थोडं हिंग घाला. सगळं छान एकजीव करुन घ्या. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि मग गार पाणी ओता. गार नको तर साधे पाणी घ्यायचे. तयार केलेली चटणी घाला. 

४. पाणी ओतल्यावर पुन्हा व्यवस्थित घुसळून घ्यायचे. चटणी ताकात मिसळली पाहिजे. दोन तीन जेवढे ग्लास हवे तेवढे प्या. 

Web Title: have digestion problems? Drink mint buttermilk, See recipe and benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.