Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > Hartalika 2025 : हरतालिकेच्या उपवासासाठी करा झटपट उपवासाचे मेदू वडे, खमंग वड्यांची सोपी रेसिपी

Hartalika 2025 : हरतालिकेच्या उपवासासाठी करा झटपट उपवासाचे मेदू वडे, खमंग वड्यांची सोपी रेसिपी

Hartalika Special : (Upvasacha Medu vada Recipe) Upwas Recipes चविष्ट चवदार उपवासाचे मेदू वडे कसे करायचे ते पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:02 IST2025-08-25T13:47:42+5:302025-08-26T15:02:09+5:30

Hartalika Special : (Upvasacha Medu vada Recipe) Upwas Recipes चविष्ट चवदार उपवासाचे मेदू वडे कसे करायचे ते पाहूया.

Hartalika Teej Special : Upvasacha Medu vada Recipe Crispy Upvasacha Medu vada Recipe | Hartalika 2025 : हरतालिकेच्या उपवासासाठी करा झटपट उपवासाचे मेदू वडे, खमंग वड्यांची सोपी रेसिपी

Hartalika 2025 : हरतालिकेच्या उपवासासाठी करा झटपट उपवासाचे मेदू वडे, खमंग वड्यांची सोपी रेसिपी

हरतालिकेला (Hartalika 2025) जवळपास सर्वच घरातील महिला उपवास करतात. उपवासाला काहीतरी चमचमीत खायचं मन करत असेल तर तुम्ही हा उपवासाचा मेदू वडा ट्राय करू शकता (Upvasacha Medu vada) उपवासाच्या दिवशी काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा प्रत्येकाचीच होत असते अशावेळी साबुदण्याची खिचडी आपण नेहमीच खातो म्हणून ती बोअरिंग वाटते. ( Crispy Upvasacha Medu vada Recipe)

चविष्ट चवदार उपवासाचे मेदूवडे कसे करायचे ते पाहूया. हे मेदू वडे खाऊन तुमचं पोट भरल्यासारखं राहील. चवीला अप्रतिम असलेले हे मेदूवडे तुम्ही अगदी कमीत कमी साहित्यात बनवू शकता. उपवासाच्या मेदूवड्यांची सोपी रेसिपी पाहूया. (How To Make Fasting Medu vada)

उपवासाच्या मेदू वड्यांसाठी लागणारं साहित्य  (Crispy Upvasacha Medu vada Recipe)

 साबुदाणा-1 कप

 उकडलेले बटाटे-2 मध्यम आकाराचे

भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट-1/2 कप 

हिरव्या मिरच्या -2-3(बारीक चिरलेल्या)

 आलं- 1/2 इंच (किसलेले किंवा पेस्ट)

 जिरे-1/2 चमचा 

मीठ-चवीनुसार सैंधव मीठ

कोथिंबीर-बारीक चिरलेली 

 तेल-तळण्यासाठी गरजेनुसार

उपवासाचे मेदूवडे करण्याची सोपी रेसिपी

१) सगळ्यात आधी साबुदाणा स्वच्छ धुवून घ्या मग भिजत घाला. एका भांड्यात घेऊन त्यात साबुदाणा बुडेल इतकेच पाणी घालून 4-5 तास किंवा रात्रभर भिजत ठेवा. यामुळे साबुदाणा छान फुलून मऊ होईल.

२) भिजवलेला साबुदाणा एका मोठ्या भांड्यात घ्या.त्यात उकडलेले बटाटे किसून किंवा हाताने कुस्करून घाला.आता त्यात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, किसलेले आले, जिरं, सैंधव मीठ आणि कोथिंबीर घाला.

३) हे सर्व साहित्य हाताने चांगले मिक्स करून त्याचा गोळा तयार करा. पाण्याचा वापर करू नका. बटाट्याच्या ओलसरपणामुळे मिश्रण सहज एकत्र करता येतं.

४) हाताला थोडे तेल किंवा पाणी लावून मिश्रणाचा छोटा गोळा घ्या.त्याला मेदू वड्याचा आकार द्या. वड्याला मध्यभागी बोटाने छोटं छिद्र करा. यामुळे वडा आतूनही व्यवस्थित तळला जातो.अशा प्रकारे सर्व वडे तयार करून एका ताटात ठेवा.

५) कढईमध्ये तेल मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात 3-4 वडे एका वेळी सोडा. वडे दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळा. तळलेले वडे टिश्यू पेपरवर काढून ठेवा, जेणेकरून अतिरिक्त तेल शोषले जाईल.

मेदू वडे परफेक्ट होण्यासाठी टिप्स

साबुदाणा भिजवताना पाण्याचा जास्त वापर करू नका. नाहीतर मिश्रण खूप चिकट होईल आणि वडे तेल शोषतील. बटाटे जास्त कुस्करू नका.अन्यथा वड्यांना योग्य आकार देता येणार नाही. तेलाचे तापमान योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे. तेल जास्त गरम असल्यास वडे बाहेरून लगेच करपतील आणि आतून कच्चे राहतील. हे वडे तुम्ही दही किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. 

Web Title: Hartalika Teej Special : Upvasacha Medu vada Recipe Crispy Upvasacha Medu vada Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.