सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे काही खातो, त्यात अशा काही पदार्थांचा समावेश असतो ज्या दिसायला तर पांढऱ्या शुभ्र आणि स्वच्छ दिसतात, पण शरीरासाठी त्या तेवढ्याच घातक असतात. निरोगी आयुष्यासाठी आपण काय खातो, यापेक्षा काय टाळतो हे जास्त महत्त्वाचे असते. आपल्या रोजच्या आहारात असे ५ पांढरे पदार्थ आहेत, ज्यांना 'व्हाईट पॉयझन' (White Poison) असे म्हटले जाते. दुर्दैवाची गोष्ट अशी की, हेच ५ पदार्थ भारतीय आहारात सर्वात जास्त प्रमाणात खाल्ले जातात(harmful white foods in daily diet).
चवीला उत्तम लागणारे हे पदार्थ हळूहळू आपले शरीर आतून पोखरत असतात आणि मधुमेह, हृदयविकार व लठ्ठपणा यांसारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देतात.रोजच्या आहारातील काही विशेष पांढरेशुभ्र पदार्थ अति प्रमाणांत खाल्ल्याने वजनवाढ, पचनाचे त्रास, साखर, बीपी आणि इतर आरोग्य समस्या सतावू शकतात. त्यामुळे रोज खात (white foods bad for health) असलेल्या या पांढऱ्या पदार्थांकडे दुर्लक्ष न करता त्यांचे दुष्परिणाम जाणून घेणं आणि योग्य मर्यादा (processed white foods dangers) पाळणं अत्यंत गरजेचं आहे. हे ५ पदार्थ नेमके कोणते आणि ते आपल्या शरीरासाठी का घातक आहेत ते पाहूयात.
नेमके कोणते आहेत ते ५ पदार्थ...
१. मेयोनीज :- चव वाढवणारे पण आरोग्य बिघडवणारे :- आजकाल मेयोनीजचा वापर अगदी घरोघरी केला जातो. स्ट्रीट फूड असो किंवा फास्ट फूड, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मेयोनीज आवडीने खातात. परंतु, हा पांढरा पदार्थ आरोग्यासाठी अतिशय हानिकारक मानला जातो. मेयोनीज बनवण्यासाठी तेल, अंड्यातील पिवळा बलक, व्हिनेगर, मीठ आणि काही रासायनिक मसाल्यांचा वापर केला जातो. NCBI नुसार, मेयोनीज अति प्रमाणांत खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) वाढू शकते, मुलांमध्ये लठ्ठपणा वेगाने वाढू शकतो आणि हाय कोलेस्ट्रॉल किंवा हृदयाशी संबंधित आजारांचा धोका निर्माण होतो.
फळ सडलं तर तेवढा भाग कापून बाकीचं फळ खाता? ही काटकसर जीवावर बेतते कारण...
२. पांढरा तांदूळ / भात :- पोट भरते, पण पोषण नाही :- भारताच्या अनेक भागांत पांढरा भात हा रोजच्या आहाराचा मुख्य भाग आहे. पण आरोग्याच्या दृष्टीने तो फारसा चांगला मानला जात नाही. पांढऱ्या भातामध्ये 'ग्लायसेमिक इंडेक्स' खूप जास्त असतो. यामध्ये कॅलरीज जास्त असतात पण फायबरचे प्रमाण खूप कमी असते. हेल्थलाईननुसार, रोज पांढरा भात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते आणि लठ्ठपणा वाढू शकतो. खराब कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाच्या आजारांचा धोकाही संभवतो.
३. व्हाईट ब्रेड :- सकाळचा नाश्ता पण आरोग्यावर भारी :- आपल्यापैकी बरेचजण अनेकदा नाश्त्यात व्हाईट ब्रेड खातात, पण तो तयार करण्याची पद्धत आरोग्यासाठी घातक आहे. व्हाईट ब्रेड बनवण्यासाठी मैदा, रिफाईंड तेल आणि प्रिजर्व्हेटिव्ह्जचा वापर केला जातो. व्हाईट ब्रेड भरपूर प्रमाणांत खाल्ल्याने वजन वेगाने वाढू शकते आणि रक्तातील साखर लगेच वाढते. दीर्घकाळ व्हाईट ब्रेड खाल्ल्याने किडनी डॅमेजचा (मूत्रपिंड निकामी होण्याचा) धोकाही वाढू शकतो.
४. मैदा :-सर्वात धोकादायक पांढरा पदार्थ :- मोमोज, चाऊमीन आणि इतर फास्ट फूडमध्ये वापरला जाणारा मैदा हा आरोग्याचा खूप मोठा शत्रू आहे. मैद्यामध्ये कोणतेही पोषक तत्व नसतात. याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्याने रक्तातील साखर वाढते आणि पोटाच्या आसपास चरबी जमा होऊ लागते. याचा आतड्यांच्या आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम होतो.
५. साखर :- आरोग्यासाठी हानिकारक पदार्थ :- साखरेला 'व्हाईट पॉयझन' असे म्हटले जाते. साखरेमध्ये शरीराला आवश्यक असलेले कोणतेही जीवनसत्व, खनिज किंवा फायबर नसते; यात फक्त कॅलरीज असतात ज्या शरीराला केवळ ऊर्जा देतात पण पोषण देत नाहीत. साखर अति प्रमाणांत खाल्ल्याने रक्तातील साखर सातत्याने वाढत राहते, ज्यामुळे शरीरात 'इन्सुलिन रेझिस्टन्स' निर्माण होतो आणि कालांतराने टाइप २ मधुमेह होण्याचा धोका वाढतो. साखर पचवण्याचे काम यकृत करते. जेव्हा आपण जास्त साखर खातो, तेव्हा यकृत त्या साखरेचे रूपांतर चरबीत करते, ज्यामुळे 'फॅटी लिव्हर' (Fatty Liver) सारखे आजार होऊ शकतात. जास्त साखर खाल्ल्याने शरीरातील कोलेजन खराब होते, ज्यामुळे चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडणे आणि त्वचा निस्तेज होणे अशा समस्या जाणवतात. साखरेमुळे तोंडात हानिकारक बॅक्टेरिया वाढतात, जे दातांचे इनॅमल नष्ट करतात आणि दात किडण्यास कारणीभूत ठरतात. साखर खाल्ल्याने मेंदूमध्ये 'डोपामाइन' हे आनंदी संप्रेरक स्रवते, ज्यामुळे शरीराला साखरेची सवय लागते आणि वारंवार गोड खाण्याची तीव्र इच्छा होते.
