Lokmat Sakhi >Food > दुधी भोपळा खाताना महागात पडू शकते 'ही' चूक, जाणून घ्या होणारे गंभीर नुकसान!

दुधी भोपळा खाताना महागात पडू शकते 'ही' चूक, जाणून घ्या होणारे गंभीर नुकसान!

Bitter Gourd And Bottle Gourd Together: दुधी भोपळा आणि कारले कधीच एकत्र खाण्याची चूक करू नये. दोन्ही भाज्या एकत्र खाल्ल्यावर काय प्रभाव पडतो हेच आज जाणून घेणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 10:35 IST2025-03-31T10:35:07+5:302025-03-31T10:35:54+5:30

Bitter Gourd And Bottle Gourd Together: दुधी भोपळा आणि कारले कधीच एकत्र खाण्याची चूक करू नये. दोन्ही भाज्या एकत्र खाल्ल्यावर काय प्रभाव पडतो हेच आज जाणून घेणार आहोत.

Harmful effects of eating bottle gourd and bitter gourd together | दुधी भोपळा खाताना महागात पडू शकते 'ही' चूक, जाणून घ्या होणारे गंभीर नुकसान!

दुधी भोपळा खाताना महागात पडू शकते 'ही' चूक, जाणून घ्या होणारे गंभीर नुकसान!

Bitter Gourd And Bottle Gourd Together: दुधी भोपळा आणि कारले अशा भाज्या आहेत ज्या घराघरांमध्ये नेहमीच आवडीनं खाल्ल्या जातात. दोन्ही भाज्यांची टेस्ट जरी खूप चांगली नसली तरी डॉक्टर नेहमीच या भाज्या खाण्याचा सल्ला देत असतात. कारण या भाज्यांमध्ये अनेक पोषक तत्व असतात. यांमध्ये मिनरल्स, फायबर, व्हिटॅमिन आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. मात्र, दुधी भोपळा आणि कारले कधीच एकत्र खाण्याची चूक करू नये. दोन्ही भाज्या एकत्र खाल्ल्यावर काय प्रभाव पडतो हेच आज जाणून घेणार आहोत.

बरेच लोक मिक्स व्हेज खाणं पसंत करतात. यासाठी वेगवेगळ्या भाज्या एकत्र केल्या जातात. पण दुधी भोपळा आणि कारले या भाज्या कधीही एकत्र खाऊ नये असं एक्सपर्ट सांगतात. 

दुधी भोपळा-कारले एकत्र खाण्याचे नुकसान

पचनासंबंधी समस्या

दुधी भोपळा आणि कारले दोन्हींमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. अशात जास्त फायबर खाल्लं गेल्यानं गॅस, ब्लोटिंग, अपचन अशा समस्या होण्याचा धोका अधिक असतो. कारले कडू असतात त्यामुळे काही लोकांना यामुळे अॅसिडिटी आणि पोटदुखीची समस्या होऊ शकते.

ब्लड शुगर लो होण्याचा धोका

कारले आणि दुधी भोपळा दोन्ही भाज्या ब्लड शुगर लेव्हल कमी करू शकतात. जर तुम्ही डायबिटीसचं औषध घेत असाल तर या भाज्या जास्त खाऊ नका. या भाज्यांमुळे हायपोग्लायसीमियाची समस्या होऊ शकते.

ब्लड प्रेशर कमी होतं

कारले आणि दुधी भोपळा दोन्ही भाज्या ब्लड प्रेशर कमी करतात. जर तुम्ही बीपीचे रूग्ण असाल किंवा ब्लड प्रेशरचं औषध घेत असाल तर या भाज्या जास्त खाऊ नये. यामुळे चक्कर येणे, कमजोरी, बेशुद्ध पडणे अशा समस्या होऊ शकतात.

टॉक्सिक इफेक्ट

दुधी भोपळा आणि कारले दोन्ही भाज्या एकत्र खाल्ल्यानं टॉक्सिक इफेक्टही होऊ शकतो. दोन्ही भाज्या एकत्र खाल्ल्यास अल्सर, उलटी, लिव्हर डॅमेज आणि टॉक्सिसिटीचा धोका वाढतो.

Web Title: Harmful effects of eating bottle gourd and bitter gourd together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.