Lokmat Sakhi >Food > हरितालिकेच्या उपवासासाठी करा टम्म फुगून हलके झालेले खमंग इंस्टंट अप्पे- पचायलाही सोपे

हरितालिकेच्या उपवासासाठी करा टम्म फुगून हलके झालेले खमंग इंस्टंट अप्पे- पचायलाही सोपे

Haritalika Fast: हरितालिकेसाठी उपवासाचे अप्पे हा एक वेगळा मेन्यू करून पाहा.(how to make instant appe for haritalika fast?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2025 10:59 IST2025-08-25T10:58:37+5:302025-08-25T10:59:55+5:30

Haritalika Fast: हरितालिकेसाठी उपवासाचे अप्पे हा एक वेगळा मेन्यू करून पाहा.(how to make instant appe for haritalika fast?)

haritalika fast, how to make instant appe for haritalika fast, appe recipe for fast, how to make appe from sabudana? | हरितालिकेच्या उपवासासाठी करा टम्म फुगून हलके झालेले खमंग इंस्टंट अप्पे- पचायलाही सोपे

हरितालिकेच्या उपवासासाठी करा टम्म फुगून हलके झालेले खमंग इंस्टंट अप्पे- पचायलाही सोपे

Highlightsसाबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, भगर- आमटी असे पारंपरिक पदार्थ खाण्यापेक्षा उपवासाचे अप्पे हा थोडा वेगळा मेन्यू ट्राय करून पाहा.

हरितालिका व्रत गणपती बसण्याच्या आदल्या दिवशी महिला अगदी भक्तीभावाने करतात. या दिवशी शंकर आणि पार्वतीची उपासना करून अखंड सौभाग्यासाठी त्यांची प्रार्थना केली जाते. या दिवशी महिला उपवास करतात. आता उपवासाला साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, भगर- आमटी असे पारंपरिक पदार्थ खाण्यापेक्षा उपवासाचे अप्पे हा थोडा वेगळा मेन्यू ट्राय करून पाहा. उपवासाच्या दिवशी अनेकजणींना ॲसिडीटीचा, अपचनाचा त्रास होतो. अप्पे खाल्ल्यामुळे तो त्रास होणार नाही (Haritalika Fast). पोटाला ते हलके, दमदार राहतील (appe recipe for fast). ते कसे करायचे याची ही खास रेसिपी..(how to make instant appe for haritalika fast?)

उपवासाचे अप्पे करण्याची रेसिपी

 

साहित्य

१ वाटी भगर

पाव वाटी साबुदाणा

पाऊण वाटी दही

सणासुदीला नाकात हवाच मराठमोळ्या नथीचा ठसठशीत आकडा, पाहा नव्या डिझाइन्स- १०० रुपयांपासून पुढे

चवीनुसार मीठ

१ टीस्पून हिरव्या मिरच्यांची पेस्ट

१ टीस्पून जिरेपूड आणि बेकिंग सोडा

 

कृती

उपवासाचे इंस्टंट अप्पे करण्यासाठी सगळ्यात आधी साबुदाणा मिक्सरमध्ये घालून तो थोडा जाडाभरडा फिरवून घ्या.

कमी झालेलं वजन काही दिवसांतच पुन्हा पटकन वाढतं? डॉक्टर सांगतात ६ टिप्स, वजन राहील स्थिर

यानंतर त्यात भगर टाका आणि ती ही थोडी जाडसर फिरवून घ्या. साबुदाणा आणि भगर दोन्ही एकत्र टाकल्यास साबुदाणा बारीक होत नाही. त्यामुळे दोन्ही पदार्थ वेगवेगळे टाकूनच मिक्सरमधून फिरवून घ्यावेत.

 

साबुदाणा आणि भगरीचे पीठ एका भांड्यामध्ये काढा. त्यात दही, बेकिंग सोडा, मिरचीची पेस्ट, जिरेपूड घाला. थोडं पाणी टाकून सगळं मिश्रण भिजवून घ्या. हे मिश्रण खूप घट्ट किंवा पातळ करू नका. यानंतर ते १५ ते २० मिनिटांसाठी झाकून ठेवा. 

गौरी पूजनासाठी घरी आलेल्या महिलांना काय गिफ्ट द्याल? ही घ्या यादी, बजेट कमी-वस्तू आकर्षक

त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण अप्पे करतो, तसेच अप्पे पात्राला तेल किंवा तूप लावून उपवासाचे अप्पे करा. घरातल्या सगळ्यांनाच हा मेन्यू खूप आवडेल. 


 

Web Title: haritalika fast, how to make instant appe for haritalika fast, appe recipe for fast, how to make appe from sabudana?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.