Lokmat Sakhi >Food > Hara Bhara Kabab Recipe: हॉटेलात स्टार्टर म्हणून महागडे हरभरा कबाब ऑर्डर करता? आता घरीच खा मनसोक्त

Hara Bhara Kabab Recipe: हॉटेलात स्टार्टर म्हणून महागडे हरभरा कबाब ऑर्डर करता? आता घरीच खा मनसोक्त

Harabhara Kebab Recipe: A delicious recipe full of nutritious vegetables, easy recipes : घरी करा भारतातील लोकप्रिय स्टार्टर रेसिपी. एकदम सोपी आणि मस्त करायला सोपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2025 16:20 IST2025-07-15T16:19:30+5:302025-07-15T16:20:20+5:30

Harabhara Kebab Recipe: A delicious recipe full of nutritious vegetables, easy recipes : घरी करा भारतातील लोकप्रिय स्टार्टर रेसिपी. एकदम सोपी आणि मस्त करायला सोपी.

Harabhara Kebab Recipe: A delicious recipe full of nutritious vegetables, easy recipes | Hara Bhara Kabab Recipe: हॉटेलात स्टार्टर म्हणून महागडे हरभरा कबाब ऑर्डर करता? आता घरीच खा मनसोक्त

Hara Bhara Kabab Recipe: हॉटेलात स्टार्टर म्हणून महागडे हरभरा कबाब ऑर्डर करता? आता घरीच खा मनसोक्त

हॉटेलला जाऊन भरपूर पैसे देऊन हराभरा कबाब खाता? खरे तर चवीला इतका मस्त असतो ना की खाल्याशिवाय राहवत नाही. (Harabhara Kebab Recipe: A delicious recipe full of nutritious vegetables, easy recipes )मग जास्तीचे पैसे कशाला देता घरीच करा की. मस्त खमंग आणि पौष्टिक. एकदम सोपी रेसिपी आहे, पाहा कसे करायचे.  

साहित्य
पालक, मटार, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, पनीर, बटाटा, मीठ, लाल तिखट, ब्रेड, जिरे पूड, धणे पूड, काजू, तेल 

कृती
१. छान ताज्या भाज्या घेऊन या. म्हणजे कबाब एकदम मस्त चविष्ट होतील. मटारचे दाणे सोलून घ्यायचे. पालकाची ताजी जुडी स्वच्छ धुवायची. व्यवस्थित निवडायची आणि मग पालक पाण्यात भिजवून ठेवायचा. थोड्या वेळाने त्यावरील माती पाण्यात उतलेल मग पाणी काढून टाकायचे. 

२. बटाटा उकडायचा. कोथिंबीरीची ताजी जुडी निवडायची आणि स्वच्छ धुवायची. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. आल्याचा लहान तुकडा घ्यायचा. तसेच पनीर किसून घ्यायचे. हिरव्या मिरचीचे लांब तुकडे करायचे. मटार आणि पालक शिजवून घ्यायचे. छान मऊ करायचे.

३. एका मिक्सरच्या भांड्यात मटारचे दाणे घ्यायचे. त्यात पालकही घालायचा. तसेच आल्याचा तुकडा घाला आणि लसणाच्या पाकळ्याही घालून घ्या. त्यात कोथिंबीर घाला आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. सगळे पदार्थ छान वाटून घ्या. त्यात पाणी घालू नका. मटार आणि पालकातील पाणी पुरेसे होते.  

४. एका परातीत उकडेले बटाटे घ्यायचे. बटाटे सोलायचे आणि कुसकरायचे. व्यवस्थित कुसकरून घ्यायचे. त्यात ब्रेड क्रम्प्स घालायचे. ब्रेड क्रम्प्स बाजारात मिळतात मात्र नसतील तर करायला अगदी सोपे आहे. ब्रेड घ्यायचा आणि सुकाच मिक्सरमध्ये फिरवायचा. एकदाच काही सेकंदासाठी फिरवायचा. त्याची पूड होते. ती सरसरीत पूड वापरायची. किसलेले पनीर घालायचे आणि नंतर तयार केलेली पेस्ट घालायची. 

५. त्यात चवी पुरते मीठ घालायचे. तसेच लाल तिखट घालायचे आणि चमचाभर जिरे पूड घालायची. धणे पूडही घालायची आणि सगळे छान मळून घ्यायचे. पातळ करायचे नाही मस्त मऊ पीठ मळायचे. काजूचे दोन तुकडे करायचे. तयार पीठाच्याच गोल टीक्की तयार करायची आणि मधे काजूचा तुकडा लावायचा. पॅन गरम करत ठेवायचा त्यात चार चमचे तेल घ्यायचे. तेलावर दोन्ही बाजूनी कबाब परतायचे. कुरुकरीत करुन घ्यायचे. आतून मऊ आणि बाहेरुन कुरकुरीत असे कबाब चवीला मस्त लागतात.    

Web Title: Harabhara Kebab Recipe: A delicious recipe full of nutritious vegetables, easy recipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.