स्वयंपाक घरात कोणताही पदार्थ करायचा म्हटलं की तेल लागतंच. वेगवेगळे पदार्थ तयार करताना किंवा तळताना तेल आवश्यकच असते. तळणीचे पदार्थ तळताना आपण कढईत नेहमीपेक्षा थोडे जास्त (Hack to keep Cooking Oil clean & clear while Frying) तेल घेतो. बरेचदा आपल्याला असा अनुभव येतो की (The Easiest Way to Clean and Reuse Frying Oil) पदार्थ तळताना तेल काळ पडून खराब होत. तसेच काहीवेळा पदार्थ तळताना त्यांतील पदार्थाचे बारीक कण कढईच्या तळाशी साचून राहून काळे होतात(How to Clean Dirty Black Cooking Oil - Trick to clean and reuse frying oil).
असे खराब झालेले तेल आपल्याला वारंवार गाळून घ्यावे लागते नाहीतर पदार्थ तळताना त्याचा रंग बदलू शकतो किंवा ते व्यवस्थित तळले जात नाहीत. अशावेळी पदार्थ तळताना आपल्याला तेल खराब होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते. कोणताही तळणीचा पदार्थ तळताना तेल काळ पडून खराब होऊ नये यासाठी आपण एक खास ट्रिक नक्कीच ट्राय करुन पाहू शकतो. तळणीचे पदार्थ (How to Clean Deep-Fry Oil Using Potato) तळताना तेल खराब होऊ नये किंवा काळ पडू नये यासाठी नेमकं करायचं काय, ते पाहूयात...
तळणीचे पदार्थ तळताना तेल खराब होऊ नये किंवा काळ पडू नये....
तळणीचे पदार्थ तळताना तेल खराब होऊ नये किंवा काळ पडू नये यासाठी एक खास ट्रिक mommywithatwist या इंस्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आली आहे. अनेकदा कोणतेही पदार्थ तळताना तेल खराब होत किंवा काळ पडत, तर कधी तेल अंगावर उडतं असे होऊ नये यासाठी कच्च्या बटाट्याचा एक काप पुरेसा आहे.
पनीर तळल्यानंतर रबरासारखे चिवट होते? १ साधीसोपी ट्रिक - तळल्यानंतरही पनीर राहील मऊमुलायम...
पदार्थ तळताना गरम तेलात सर्वातआधी, कच्च्या बटाट्याचे एक ते दोन काप कापून घालावेत. त्यानंतर आपल्याला जो पदार्थ तळायचा आहे तो पदार्थ तेलात सोडून तळून घ्यावा. पदार्थ संपूर्ण तळून होईपर्यंत कच्च्या बटाट्याचा काप तेलात तसाच राहू द्यावा. जेव्हा कच्च्या बटाट्याचा रंग बदलून हलकासा चॉकलेटी - ब्राऊन दिसतो तेव्हा हा काप काढून पुन्हा नवीन काप घालून पदार्थ तळून घ्यावेत. पदार्थ तळताना कढईतील तेलात कच्च्या बटाट्याचा काप चिरुन घातल्यास तेलाचा रंग बदलून ते काळ पडत नाही किंवा खराब होत नाही.
पदार्थ तळताना त्यात कच्च्या बटाट्याचा काप घातल्याने, ते एखाद्या स्पंजप्रमाणेच काम करते. तेलातील काळपट अन्नकण शोषून घेते, तसेच तेलाचा रंग बदलून तेल काळ देखील पडत नाही. या उपायामुळे तळणीच्या पदार्थांना तेलाचा तेलकट वास देखील येत नाही. कच्च्या बटाट्यात असणाऱ्या स्टार्चमुळे तळणीच्या तेलाचा रंग बदलून ते काळ पडत नाही व खराब देखील होत नाही. कढईतील तेलात घालायचे कच्च्या बटाट्याचे काप लहान आणि मध्यम आकाराचे असावेत तसेच ते तेलात जास्त वेळ ठेवू नये, त्यांचा रंग बदलला की काढून दुसरा कच्च्या बटाट्याचा काप घालावा.