गुढी पाडव्याच्या दिवशी तुम्ही घरच्याघरी सोडा न घालतासुद्धा तुम्ही हॉटेलसारखी कुरकुरीत बटाटा भजी करू शकता (Cooking Hacks). गुडी पाडव्याला श्रीखंड पुरीच्या ताटात कुरीत बटाटा भजी असेल तर जेवणाची रंगत असूनच वाढेल. बटाटा भजी परफेक्ट होण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. या टिप्स वापरून तुम्ही खमंग, कुरकुरीत अशा बटाटाभजी बनवू शकता. (How To Make Perfect Batata Bhaji)
१) कुरकुरीत भजीसाठी जुने बटाटे वापरा. नवीन बटाट्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यानं ते मऊ पडतात.
२) बटाटे चिरताना त्याचे काप खूप जाड ठेवू नका. मध्यम किंवा थोडे पातळ काप लवकर आणि छान कुरकुरीत होतात.
३) बटाटे चिरल्यानंतर २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्यानं धुवा आणि १० मिनिटं थंड पाण्यात भिजत ठेवा. यामुळे त्यातील स्टार्च निघून जातं.
४) पाण्यातून काढल्यामुळे बटाटे एका सुती कापडावर पसरवून पूर्णपणे कोरडे करून घ्या. बटाट्यात ओलावा राहिला तर ते कुरकुरीत होत नाहीत.
५) बेसन पिठात २ ते ३ चमचे तांदळाचे पीठ किंवा कॉर्नफ्लोअर घाला. यामुले भजीला नैसर्गिक कुरकुरीतपणा येतो.
६) पिठाचे मिश्रण भिजवताना त्यात १ ते २ चमचे कडकडीत गरम तेलाचे मोहन घाला. यामुळे सोडा न घालतानाही भजी छान फुलतात.
७) भजीचे पीठ जास्त पातळ करू नका. पीठ बटाट्याच्या कापांना व्यवस्थित चिकटेल इतपत मध्यम दाट असावे.
८) पीठ भिजवल्यानंतर ते ३-४ मिनिटे एकाच दिशेने चांगले फेटून घ्या. यामुळे पिठात हवा भरली जाते आणि भजी हलकी होतात.
९) भजी तळताना तेल चांगले गरम असावे. कमी गरम तेलात भजी टाकल्यास ती तेलकट होतात आणि कुरकुरीत होत नाहीत.
१०) सुरुवातीला भजी मध्यम आचेवर तळा आणि शेवटच्या १ मिनिटात आच मोठी करा, ज्यामुळे बाहेरचे आवरण कडक होईल.
११) जास्त कुरकुरीतपणा हवा असल्यास, भजी अर्धवट तळून काढा आणि खाण्यापूर्वी पुन्हा एकदा कडकडीत तेलात तळून घ्या.
Web Summary : Make crispy Batata Bhaji for Gudi Padwa using these easy tips. Use old potatoes, thin slices, and rice flour for extra crispiness. Fry twice for perfect results.
Web Summary : इन आसान टिप्स से गुड़ी पड़वा के लिए क्रिस्पी बटाटा भजी बनाएं। पुराने आलू, पतले स्लाइस और चावल के आटे का उपयोग करें। बेहतरीन परिणाम के लिए दो बार तलें।