Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडवा स्पेशल: श्रीखंडपुरीसोबत हवीच बटाट्याची खमंग भाजी, पाहा बटाट्याच्या भाजीची परफेक्ट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2026 14:53 IST

Gudhi Padva Special Batata Bhaji Recipe: परफेक्ट चवीची बटाट्याची भाजी अनेकींना जमतच नाही. बघा ती नेमकी कशी करायची...(aloo sabji recipe in Marathi)

गुढीपाडव्याच्या दिवशी कित्येक घरांमध्ये श्रीखंड पुरीचा बेत केला जातो. चवदार श्रीखंड आणि त्याच्या जोडीला गरमागरम पुऱ्या हा मेन्यू खऱ्या अर्थाने तेव्हाच रंगतो जेव्हा त्यांच्यासोबत पानामध्ये बटाट्याची उकडून केलेली चवदार भाजीही असते. त्यामुळे गुढी पाडव्याच्या दिवशी श्रीखंड, पुरी आणि बटाट्याची भाजी असं बऱ्याच घरांमध्ये दिसून येतं. पण अडचण अशी की अनेक जणींना बटाट्याच्या भाजीची अस्सल चव जमतच नाही. त्यांना असं वाटतं की आपण केलेल्या भाजीत काहीतरी कमतरता असून थोडा फ्लेवर कमी पडतो आहे. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर उकडलेल्या बटाट्यांची परफेक्ट भाजी कशी करायची ते पाहूया..(Gudhi Padva Special Batata Bhaji Recipe)

उकडलेल्या बटाट्यांची भाजी करण्याची रेसिपी

 

साहित्य

४ ते ५ मध्यम आकाराचे बटाटे आणि २ कांदे

५ ते ६ हिरव्या मिरच्या

स्वयंपाकाचा कंटाळा आला? रात्रीसाठी करा अस्सल गुजराथी चवीची 'फाडा नी खिचडी', सोपी पौष्टिक रेसिपी 

किसलेलं आलं आणि ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या

बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कडिपत्त्याची ५ ते ६ पाने

फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग आणि १ टीस्पून उडीद डाळ

चवीनुसार मीठ आणि थोडीशी धनेपूड

 

कृती 

सगळ्यात आधी तर बटाटे व्यवस्थित उकडून घ्या. त्यांची सालं काढून घ्या आणि मग त्यांच्या मध्यम आकाराच्या फोडी करा. 

गॅसवर कढई गरम करायला ठेवून तेल, मोहरी, जिरे, हिंग, कडिपत्ता घालून फोडणी करून घ्या. त्यानंतर उडीद डाळ घालून ती ही खमंग परतून घ्यावी. मध्यम आचेवर कांदा परतून घ्या.

शर्ट पांढराशुभ्र आणि कॉलर मात्र कळकट्ट? हा घ्या उपाय, न घासता कॉलर होईल चकाचक..

यानंतर मिक्सरमधून बारीक केलेलं हिरव्या मिरच्यांचं वाटण आणि आल्याची पेस्ट आणि लसूण घालून परतून घ्या. हे पदार्थ परतून घेताना कांदा, लसूण, आलं यांना अजिबातच जळकट वास लागणार नाही याची काळजी घ्यावी. 

यानंतर हळद घालून उकडलेल्या बटाट्यांच्या फोडी धनेपूड, चवीनुसार मीठ घाला. सगळी भाजी व्यवस्थित हलवून कढईवर झाकण ठेवून द्या. यावेळी गॅस अगदी मंद ठेवावा. ६ ते ७ मिनिटांनी भाजी हलवून घ्यावी आणि पुन्हा झाकण ठेवून १ ते २ मिनिटे वाफ येऊ द्यावी. सगळ्यात शेवटी गॅस बंद करून मग कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं घालावं. बटाट्याची चवदार भाजी तयार.. ट्राय करून पाहा. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Gudi Padwa Special: Potato Vegetable Recipe for Shrikhand Puri

Web Summary : Make delicious potato vegetable to accompany Shrikhand Puri this Gudi Padwa. This recipe includes potatoes, onions, green chilies, ginger-garlic paste, coriander, and spices. Cook until tender and flavorful.
टॅग्स :गुढीपाडवापाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्न