Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडवा स्पेशल: केशर- बदाम श्रीखंड रेसिपी, फक्त १० मिनिटांत श्रीखंड तयार- घ्या झटपट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2026 17:36 IST

Gudhi Padva 2026: गुढीपाडव्याच्या निमित्ताने विकतचं श्रीखंड आणण्याऐवजी घरीच अगदी सोप्या पद्धतीने श्रीखंड कसं तयार करायचं ते पाहूया...(Gudhi Padva special shrikhand recipe)

ठळक मुद्देरेसिपी अतिशय सोपी असून घरीच अतिशय उत्कृष्ट चवीचं केशर, बदाम श्रीखंड कसं करायचं ते पाहूया..

गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला सण (Gudhi Padva 2026). पहिल्या सणाचा आनंद आणि उत्साह काही वेगळाच असतो. आता गुढीपाडवा म्हटलं की काही ठिकाणी वर्षाचा पहिला सण म्हणून पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो, तर बहुसंख्य ठिकाणी श्रीखंड पुरीचा बेत असतो.. आता काही जणींना श्रीखंड तयार करणं हे खूपच कठीण आणि वेळखाऊ काम वाटतं. तुमचंही असंच असेल तर अगदी १० ते १५ मिनिटांत श्रीखंड कसं तयार करायचं याची ही रेसिपी एकदा बघाच (Gudhi Padva special shrikhand recipe).. रेसिपी अतिशय सोपी असून घरीच अतिशय उत्कृष्ट चवीचं केशर, बदाम श्रीखंड कसं करायचं ते पाहूया..(easy and simple recipe of making shrikhand)

केशर- बदाम श्रीखंड करण्याची रेसिपी

 

साहित्य

३ वाट्या दही

एक वाटी पिठी साखर

केशराच्या ८ ते १० काड्या आणि १ टीस्पून वेलची पूड

Summer Special: उसाच्या रसाविषयीचे ३ मोठे गैरसमज, रणरणत्या उन्हात वाट्टेल तेव्हा रस पिण्याआधी 'हे' वाचा

८ ते १० बदामाचे काप

कृती

केशर बदाम फ्लेवरचं श्रीखंड करण्यासाठी सगळ्यात आधी केशर एका कागदात घ्या आणि हा कागद गरम तव्यावर अगदी अर्धा मिनिट ठेवा. त्यानंतर त्यातलं केशर काढून ते एका वाटीत घाला आणि त्यात अगदी चमचाभर पाणी घाला.

 

यानंतर दही एका सुती कपड्यात घट्ट गुंडाळून घ्या आणि अगदी पिळून पिळून त्यातलं जास्तीचं पाणी काढून टाका. हाताने भरपूर दाब देऊन पाणी काढून टाकलं तर अगदी ५ ते ७ मिनिटांत दह्यातलं सगळं पाणी निघून जातं आणि छान घट्ट चक्का दही तयार होतं.

उन्हाळा वाळवण स्पेशल : साबुदाण्याच्या चकल्या करण्याची पारंपरिक सोपी रेसिपी, खुसखुशीत हलकी चकली वर्षभर खा

आता घट्ट चक्का दही एका भांड्यात घ्या. हे दही जेवढं असेल त्याच्या थोडी कमी याप्रमाणात साखर घाला. म्हणजेच जर घट्ट दही १ वाटी असेल तर त्यात पाऊण वाटी साखर घालावी. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण वाढवावं. तसेच श्रीखंड करण्यासाठी नेहमी पिठी साखरच वापरावी. आता बदामाचे काप, वेलचीपूड आणि भिजत घातलेल्या केशराचं पाणी दह्यामध्ये घालून सगळे पदार्थ छान फेटून एकजीव करून घ्यावे. कोणताही विकतचा रंग न घालता अतिशय छान हलका केशरी रंग तुमच्या श्रीखंडाला आलेला असेल. शिवाय या श्रीखंडाची चव विकत मिळणाऱ्या श्रीखंडापेक्षा तर कित्येक पटींनी जास्त छान असेल. या गुढीपाडव्याला श्रीखंड करण्याची ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पाहा. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Gudi Padwa Special: Quick Kesar-Badam Shrikhand Recipe in Just 10 Minutes

Web Summary : Make delicious Kesar-Badam Shrikhand at home in minutes! This easy recipe uses simple ingredients like yogurt, sugar, saffron, and almonds for a perfect festive treat. Try it this Gudi Padwa!
टॅग्स :गुढीपाडवाअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.