lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > ठेचा पाव? ऐकून आश्चर्य आणि तोंडाला पाणी सुटलं ना? झणझणीत ठेचा पाव कसा करायचा? पाहा..

ठेचा पाव? ऐकून आश्चर्य आणि तोंडाला पाणी सुटलं ना? झणझणीत ठेचा पाव कसा करायचा? पाहा..

green chilli thecha pav recipe | thecha stuffed pav : भजी पाव-वडा पाव नेहमीचाच; एकदा पावात ठेच्याचं सारण भरून झणझणीत ठेचा पाव करून खा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2024 01:55 PM2024-02-23T13:55:07+5:302024-02-23T13:55:53+5:30

green chilli thecha pav recipe | thecha stuffed pav : भजी पाव-वडा पाव नेहमीचाच; एकदा पावात ठेच्याचं सारण भरून झणझणीत ठेचा पाव करून खा..

green chilli thecha pav recipe | thecha stuffed pav | ठेचा पाव? ऐकून आश्चर्य आणि तोंडाला पाणी सुटलं ना? झणझणीत ठेचा पाव कसा करायचा? पाहा..

ठेचा पाव? ऐकून आश्चर्य आणि तोंडाला पाणी सुटलं ना? झणझणीत ठेचा पाव कसा करायचा? पाहा..

महाराष्ट्रीयन थाळीमध्ये तोंडी लावण्यासाठी बरेच पदार्थ आहेत. लोणची, पापड, फ्रायम्स, यासह ठेचा देखील आवडीने खाल्ला जातो. हिरव्या मिरचीचा ठेचा आपण खाल्लाच असेल. महाराष्ट्रातील विविध भागात ठेचा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. पण आपण कधी ठेचा पाव खाऊन पाहिलं आहे का? वडा पाव, भजी पाव, मिसळ पाव, अगदीच मसाला पाव देखील आपण खाल्ला असेल. पण ठेचा पाव? ऐकून आश्चर्य आणि तोंडात पाणी सुटलं ना?

जर आपल्याला झणझणीत आणि काहीतरी चविष्ट खाण्याची इच्छा झाली असेल तर, एकदा ठेचा पाव खाऊन पाहा (Cooking Tips). आपल्याला हा पदार्थ नक्कीच आवडेल(green chilli thecha pav recipe | thecha stuffed pav).

ठेचा पाव करण्यासाठी लागणारं साहित्य

तेल

हिरवी मिरची

लसूण

जिरं

हिंग

मीठ

कुकरच्या शिट्टीतून फसफसून पाणी येतं? डाळ शिजतच नाही? ५ गोष्टींकडे कधीच दुर्लक्ष करू नका, कारण..

कोथिंबीर

शेंगदाणे

बटर

पाव

बटाटे

चीज

कृती

सर्वप्रथम आपण ठेचा बनवून घेऊया. पॅनमध्ये २ चमचे तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, १० ते १२ लसणाच्या पाकळ्या, एक चमचा जिरं, चिमुटभर हिंग आणि चवीनुसार मीठ घालून भाजून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि भाजलेले शेंगदाणे घालून भाजून घ्या. भाजलेलं साहित्य एका खलबत्त्यात काढून घ्या. नंतर साहित्य ठेचून एका बाऊलमध्ये काढून घ्या.

ना गॅसचा वापर-ना फ्रिजची गरज, सेकंदात लिंबू सरबत करण्याची खास युक्ती-होईल सरबत झटक्यात रेडी

दुसरीकडे पॅनमध्ये बटरचा एक क्यूब घाला. बटर विरघळल्यानंतर त्यात २ चमचे ठेचा आणि उकडलेला बटाटा घालून परतवून घ्या. परतलेलं साहित्य एका बाऊलमध्जे काढून घ्या. तव्यावर थोडं बटर घाला. बटर वितळल्यानंतर त्यावर पाव ठेवून दोन्ही बाजूने भाजून घ्या. पावाच्या मधोमध परतलेलं साहित्य आणि किसलेलं चीज भरून पाव पुन्हा दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. अशा प्रकारे झणझणीत ठेचा पाव खाण्यासाठी रेडी. सायंकाळची छोटी भूक भागवण्यासाठी हा बेस्ट नाश्ता आहे.

Web Title: green chilli thecha pav recipe | thecha stuffed pav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.