हिरव्यागार मिरच्या पाहिल्या की अनेकजणींना त्या घेण्याचा आणि त्यांच्यापासून वेगवेगळे पदार्थ करण्याचा मोह आवरत नाही. कारण मिरचीचा कोणताही पदार्थ जेवणात तोंडी लावायला असेल तर मग जेवणाची मजा निश्चितच जास्त वाढत जाते. मिरचीचा ठेचा हा पदार्थ तर महाराष्ट्रात घरोघरी असतोच. त्यात कधीतरी वेगळेपणा म्हणूनच तळलेल्या मिरच्या, ताकातल्या मिरच्या, दही मिरची किंवा मग मिरचीचं लोणचंही केलं जातं. आता त्याच मिरचीच्या लोणच्याची ही एक अतिशय वेगळी आणि अगदी सोपी रेसिपी पाहा (green chilli pickle recipe).. ही रेसिपी तुम्ही अगदी १० मिनिटांत करू शकता आणि शिवाय हे लोणचं जास्त दिवस छान टिकतं.(how to make green chilli pickle or green chili achar?)
मिरचीचं लोणचं करण्याची रेसिपी
साहित्य
१० ते १२ कमी तिखट असणाऱ्या हिरव्या मिरच्या
अर्धा चमचा तिखट आणि चिमूटभर हिंग
घरी केलेला मंचुरियन मऊ न होता दगड-घट्ट होतात? ६ टिप्स- चायनिज हॉटेलपेक्षाही भारी होतील..
बडिशेप आणि जिरे प्रत्येकी २ चमचे
१ चमचा मोहरी आणि अर्धा चमचा मेथी दाणे
२ चमचे तेल आणि एका लिंबाचा रस
चवीनुसार लाल तिखट आणि मीठ
कृती
मिरच्या स्वच्छ धुवून पुसून एकदम कोरड्या करून घ्या. त्यांचे मध्यम आकाराचे काप करून घ्या.
यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये मोहरी, बडिशेप, जिरे आणि मेथ्या भाजून घ्या. थंड झाल्यानंतर मिक्सरमधून सगळे पदार्थ वाटून घ्या.
केस विंचरल्यावर कंगव्यात एकही केस दिसणार नाही, कांदा- चहा पावडरचा सोपा उपाय, केस गळणं बंद
आता मिरचीचे तुकडे, मसाला, लिंबाचा रस, हळद, मीठ आणि तिखट हे सगळं साहित्य एकत्र करा. त्यामध्ये मग गरम करून थंड करून घेतलेलं तेल घाला. सगळं छान हलवून घेतलं की मिरचीचं झणझणीत लोणचं तयार. हे लोणचं करायला अगदी १० मिनिटेही पुरेसे आहेत. शिवाय एकदा तुम्ही लोणचं घातलं की ते महिनोंमहिने अगदी चांगलं टिकतं.
Web Summary : Craving a flavorful side? This article shares a quick and easy recipe for green chili pickle. Ready in 10 minutes, this pickle uses simple ingredients and stays fresh for months. Perfect to spice up any meal!
Web Summary : स्वादिष्ट साइड डिश की तलाश है? यह लेख हरी मिर्च के अचार की एक त्वरित और आसान रेसिपी साझा करता है। 10 मिनट में तैयार, इस अचार में सरल सामग्री का उपयोग किया जाता है और यह महीनों तक ताजा रहता है। किसी भी भोजन को मसालेदार बनाने के लिए बिल्कुल सही!