Lokmat Sakhi >Food > गोकुळाष्टमी स्पेशल: करा उपवासाचा साबुदाणा केक- सोपी रेसिपी - वेगळा गोड सोपा पदार्थ

गोकुळाष्टमी स्पेशल: करा उपवासाचा साबुदाणा केक- सोपी रेसिपी - वेगळा गोड सोपा पदार्थ

Gokulashtami special recipe: Sabudana cake recipe: Fasting recipes Indian : उपवासाला काही खास बनवायचे असेल तर साबुदाणा मिल्क केक ट्राय करु शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2025 12:17 IST2025-08-15T12:15:55+5:302025-08-15T12:17:18+5:30

Gokulashtami special recipe: Sabudana cake recipe: Fasting recipes Indian : उपवासाला काही खास बनवायचे असेल तर साबुदाणा मिल्क केक ट्राय करु शकतो.

Gokulashtami special recipeHow to make sabudana cake for fasting Step-by-step sabudana cake recipe for vrat | गोकुळाष्टमी स्पेशल: करा उपवासाचा साबुदाणा केक- सोपी रेसिपी - वेगळा गोड सोपा पदार्थ

गोकुळाष्टमी स्पेशल: करा उपवासाचा साबुदाणा केक- सोपी रेसिपी - वेगळा गोड सोपा पदार्थ

भारतीय सण आणि गोडाचे पदार्थ यांची गोष्ट काही औरच! श्रावण मास सुरु झाला की, आपल्याकडे सणसमारंभ सुरु होतात तसेच विविध पदार्थांची रेलचेल देखील सुरु होते.(Fast Recipe) या काळात अनेक व्रत-वैकल्य देखील असतात. उपवास म्हटलं की, सगळ्यात आधी डोळ्यांसमोर दिसू लागतो तो साबुदाणा. पण सतत तिच साबुदाण्याची खिचडी खाऊन आपल्या वैताग येतो. मग अशावेळी आपण विविध पदार्थ ट्राय करु लागतो.(Gokulashtami special recipe) 
गोकुळाष्टमीच्या सणानिमित्त आपल्या श्रीकृष्णाला गोडाचा नैवेद्य अर्पण करावा लागतो.(Easy sweet recipes for fasting) भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. आणि नैवेद्यामध्ये खास पदार्थ देखील बनवले जातात.(Unique vrat recipes) जर आपल्याला देखील यंदाच्या जन्माष्टमीला काही वेगळे आणि खास बनवायचे असेल तर साबुदाणा मिल्क केक ट्राय करु शकतो.(Fasting recipes Indian) अगदी ४० ते ५० मिनिटांत तयार होईल. यासाठी आपल्या ओव्हनची गरज देखील लागणार नाही. हा एक आपण उपवास असताना देखील खाऊ शकतो. पाहूया रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती. 

गणेशोत्सव २०२५ : बाप्पाच्या स्वागतासाठी यंदा फक्त १० मिनिटांत करा बिस्किटांचा मोदक- मुलांनाही आवडतील खूप

साहित्य 

साबुदाणा - १ कप 
दूध - १ लिटर 
साखर - १ कप 
तूप - २ ते ३ चमचे
वेलची पावडर - अर्धा चमचा 
सुकामेवा - सजावटीसाठी 

बेसनाचा पोळा तव्याला चिकटतो? पाहा १ चमचा मिठाचा सोपा उपाय-पोळ्याला पडेल छान जाळी

कृती 

1. सगळ्यात आधी साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून ३ ते ४ तास पाण्यात भिजवा. त्यानंतर जाड बुंद्याच्या कढईमध्ये दूध उकळत ठेवा. चमच्याने दूधाला हलवत राहा. दूध थोडे घट्ट होऊ द्या. 

2. दूध घट्ट झाल्यानंतर त्यात साबुदाणा घालून मंद आचेवर हलवत राहा. साबुदाणा शिजेपर्यंत चमचा हलवत राहा. साबुदाणा व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात चमचाभर तूप आणि साखर घालून चांगले हलवा. साखर वितळल्यानंतर वरुन वेलची पूड घाला. 

3. आता एका ट्रे ला तूप लावून तयार साबुदाण्याचे सारण त्यात परसरवा. वरुन सुकामेवा घालून व्यवस्थित सेट करुन घ्या. थंड झाल्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कापून घ्या. तयार होईल साबुदाणा मिल्क केक. 

Web Title: Gokulashtami special recipeHow to make sabudana cake for fasting Step-by-step sabudana cake recipe for vrat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.