Join us

गोकुळाष्टमी स्पेशल: नैवैद्याच्या पानात हवीच मसालेदार तोंडली, भाजी चविष्ट आणि पौष्टिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2025 15:58 IST

Gokulashtami special recipe: tondali recipe : उपवास सोडताना नैवेद्याच्या ताटात भाजी काय बनवायची असा प्रश्न पडला असेल तर चविष्ट, मसालेदार तोंडलीची भाजी ट्राय करा.

तोंडली म्हटली की, अनेकजण खाण्यासाठी नाक मुरडतात.(Gokulashtami special recipe) मुलांना तर ही भाजी आवडतच नाही त्यामुळे सहसा बनवली देखील जात नाही. पण न आवडणारी तोंडली ही आरोग्यासाठी पौष्टित आहे.(tondali recipe) मसाले भातापासून विविध मिक्स भाज्यांमध्ये तोंडलीचा वापर केला जातो. या भाजीमध्ये व्हिटॅमिन, लोह, फायबरचे प्रमाण अधिक आढळते.(vegetarian recipes) इतकेच नाही तर पचायला देखील ही भाजी हलकी आहे. (spicy tondli recipe)तोंडली चवीला तुरट देखील असल्यामुळे आपल्याला फारशी आवडत नाही.(festive vegetarian dish) कापण्यासाठी अधिक वेळ देखील घेते. पण सण-समारंभात तोंडलीची भाजी आवर्जून बनवली जाते. पुलावा भात असो किंवा इतर भाज्यांमध्ये हमखास तिचा वापर केला जातो.(naivedya recipes) उपवास सोडताना नैवेद्याच्या ताटात भाजी काय बनवायची असा प्रश्न पडला असेल तर चविष्ट, मसालेदार तोंडलीची भाजी ट्राय करा.(healthy festive food) ही भाजी बनवताना आपल्याला कांदा-लसणाची गरजही लागणार नाही. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. 

अंगारकी चतुर्थी: बाप्पाच्या नैवेद्यासाठी करा खास केळीचे मोदक! मुलंही खातील मजेत-पौष्टिक आणि चविष्ट मोदक

साहित्य 

तोंडली - १ मोठी वाटीगाजर - १ वाटी ओल्या नारळाचा किस - १ वाटी हळद- १ चमचा जिरे - १ चमचा हिरव्या मिरच्या - ४कढीपत्त्याची पाने - ७ ते ८तेल - आवश्यकतेनुसार मोहरी - १ चमचा मीठ - चवीनुसार 

कृती 

1. सगळ्यात आधी तोंडली आणि गाजर व्यवस्थित धुवून उभ्या आकारात कापून घ्या. त्यानंतर एका ताटात दोन्ही मिक्स करुन घ्या. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यांमध्ये ओल्या नारळाचा किस, हळद, जिरे, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून त्याची पेस्ट करुन घ्या. ही पेस्ट करताना त्यात अजिबात पाणी घालायचे नाही. 

2. आता कढई गरम करुन त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी तडतडू द्या. आता मिक्स केलेले तोंडली आणि गाजर तेलात परतवून घ्या. ताट झाकून ठेवा. ताटावर पाणी घाला. पाणी घालण्यासाठी ताट खोलगट असायला हवं. ज्यामुळे भाजी लवकर शिजेल आणि जळणार देखील नाही. ५ ते १० मिनिटानंतर भाजी शिजली आहे की, नाही पाहा. आता त्यात वरुन मीठ घालून पुन्हा परतवून घ्या. यामध्ये तयार मिक्सरमधलं वाटण घालून चांगले मिक्स करा. सर्व्ह करा चविष्ट, मसाला तोंडली  

टॅग्स :अन्नपाककृतीजन्माष्टमी