Lokmat Sakhi >Food > गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश

गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश

Janmashtami Special Recipe: गोकुळाष्टमीचा नैवेद्य आणि बाळकृष्णाचा वाढदिवस म्हणून ही रेसेपी ट्राय करा, पुढे प्रत्येक वाढदिवसाला याचीच डिमांड होईल हे नक्की!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 16:27 IST2025-08-14T16:23:46+5:302025-08-14T16:27:50+5:30

Janmashtami Special Recipe: गोकुळाष्टमीचा नैवेद्य आणि बाळकृष्णाचा वाढदिवस म्हणून ही रेसेपी ट्राय करा, पुढे प्रत्येक वाढदिवसाला याचीच डिमांड होईल हे नक्की!

Gokulashtami Special: Make a sattvic-flavored Panchamrut cake on Gokulashtami; the Balgopals of the house will be happy | गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश

गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश

गोकुळाष्टमीची अनेकांना सुट्टी नसते, परंतु यंदा योगायोगाने स्वातंत्र्य दिनही त्याच दिवशी आल्याने आणि विकेंड जोडून आल्याने अनेक घरात आनंदाचे वातावरण असणार हे नक्की. सेलिब्रेशन म्हटले की चांगल्या चुंगल्या पदार्थांची फर्माईश ओघाने आलीच. अशा वेळी पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ म्हणून हा पंचामृत केक तुम्हाला करता येईल. 

साहित्य

अर्धी वाटी - दही
अर्धी वाटी - साय
पाव वाटी - तूप 
अर्धा वाटी  - साखर
एक वाटी - बारिक रवा
अर्धी वाटी - दूध
पाव चमचा- सोडा
दीड चमचा - बेकिंग पावडर
इसेंन्स किंवा केशर 
मिक्स ड्राय फ्रूट, मध 

कृती

>> दही, साय, तुप आणि साखर एकत्र फेटून घ्या. 
>> त्यात बारीक रवा मिक्स करून झाकून ठेवा. 
>> तीन तासांनी त्यात इसेंन्स आणि दूध घालून मिश्रण एकत्र करा. 
>> त्यात सोडा आणि बेकिंग पावडर घालुन परत पाव वाटी दूध घालून मिक्स करा. 
>> ओव्हन 180° वर गरम करायला ठेवा किंवा कढईत करणार असाल तर जाड बुडाच्या कढईत खडे मीठ घालून ती गॅसवर प्रीहिट करून घ्या. 
>> केक पात्र तयार करुन घ्या. त्यात केकचं मिश्रण ओतून वर ड्राय फ्रूट घाला. 
>> कढईत करताना केक पात्र आत ठेवून त्यावर झाकण ठेवा आणि सुरुवातीला १० मिनिट गॅस मोठा ठेवा. 
>> नंतर २० मिनिटं गॅस मध्यम ठेवा. केक होत आला की ५ मिनिटं बारीक आचेवर ठेवा. 
>> उघडल्यावर थोडा वेळ केक पात्रामध्येच राहू द्या
>> केक पूर्णतः थंड झाल्यावर मध घालून सर्व्ह करा. 

पहा रेसेपी : 


Web Title: Gokulashtami Special: Make a sattvic-flavored Panchamrut cake on Gokulashtami; the Balgopals of the house will be happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.