Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > कोशिंबीरीला द्या टेस्टी ट्विस्ट - दह्याची चवच बदलून जाईल, कोशिंबीरीचे दही करण्याची सोपी रेसिपी

कोशिंबीरीला द्या टेस्टी ट्विस्ट - दह्याची चवच बदलून जाईल, कोशिंबीरीचे दही करण्याची सोपी रेसिपी

Give Your Salad a Tasty Twist – Transform the Flavor of Curd with This Easy Kosimbir Yogurt Recipe : चविष्ट कोशिंबीरीसाठी दही असे वापरा. पाहा रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2026 14:06 IST2026-03-26T14:03:32+5:302026-03-26T14:06:05+5:30

Give Your Salad a Tasty Twist – Transform the Flavor of Curd with This Easy Kosimbir Yogurt Recipe : चविष्ट कोशिंबीरीसाठी दही असे वापरा. पाहा रेसिपी.

Give Your Salad a Tasty Twist – Transform the Flavor of Curd with This Easy Kosimbir Yogurt Recipe | कोशिंबीरीला द्या टेस्टी ट्विस्ट - दह्याची चवच बदलून जाईल, कोशिंबीरीचे दही करण्याची सोपी रेसिपी

कोशिंबीरीला द्या टेस्टी ट्विस्ट - दह्याची चवच बदलून जाईल, कोशिंबीरीचे दही करण्याची सोपी रेसिपी

उन्हाळ्यात विविध प्रकारच्या कोशिंबीरी नक्की खाव्यात. पोटाला थंडावा मिळावा यासाठी आपण अनेक रेसिपी करत असतो. त्याची शरीराला फारच गरज असते. मात्र त्याचं त्याच चवीचे पदार्थ खात राहीलो तर त्याचा कंटाळा येतो. उन्हाळ्यात रोज आहारात कोणती तरी कोशिंबीर असायलाच हवी. दोन चमचे खाल्ली तरी पोटाला आराम मिळतो. (Give Your Salad a Tasty Twist – Transform the Flavor of Curd with This Easy Kosimbir Yogurt Recipe)दह्यातली कोशिंबीर सगळेच करतात. घट्ट दह्याची कोशिंबीर आजकाल फार ट्रेंडींग आहे. मसालेदार घट्ट दही कोशिंबीरीत असेल तर चव अप्रतिम लागते. कोशिंबीरीसाठी असे मसालेदार घट्ट दही तयार करणे अगदी सोपे आहे. पाहा क्रिमी आणि पौष्टिक कोशिंबीर तयार करण्याची रेसिपी. 

साहित्य 
दही, लाल तिखट, धणे - जिरे पूड, पुदिना, कोथिंबीर, आलं, लसूण

कृती 
१. छान ताजं दही घ्यायचं. मस्त गोडसर दही घ्या आंबट नको. दही एका पातळ कॉटन किंवा सुती कापडात घ्यायचं. श्रीखंड करताना चक्का लावण्यासाठी जसे दही बांधता त्या पद्धतीने दही बांधून जरा पिळून घ्यायचं. त्यावर वजन ठेवायचं आणि अगदी मोजून २ ते ५ मिनिटे ठेवायचे. नंतर ते एका खोलगट भांड्यात काढून घ्यायचं. 

२. एका मिक्सरच्या भांड्यात लसणाच्या काही सोललेल्या पाकळ्या घ्यायच्या. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. आल्याचा लहान तुकडा घालायचा. मस्त निवडलेली ताजी कोथिंबीर घालायची आणि त्याचप्रमाणे निवडलेला ताजा पुदिना घालायचा. वाटून घ्यायचे. त्याची एकजीव पेस्ट तयार करायची. पाणी न वापरता पेस्ट करायची. 

३. पातेल्यात घेतलेल्या दह्यात चमचाभर लाल तिखट घालायचे, तसेच थोडे धणे - जिरे पूड घालायचे. तयार केलेली पेस्ट घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचे. दही मस्त फेटून घ्यायचे. सगळं एकजीव होईल याची काळजी घ्यायची. फेटून ते मस्त क्रिमी होईल. शक्यतो पाणी त्यात राहणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजे ते क्रिमी होतं.

तुम्हाला आवडतील त्या भाज्या त्यात घाला. त्यात उकडलेला बटाटा घातला तरी छानच लागतो. शिवाय हे दही चटणी म्हणूनही वापरता येते. चवीला मस्त लागते नक्कीच करुन पाहा.  

Web Title : कोशिंबीर को दें स्वादिष्ट ट्विस्ट: आसान दही कोशिंबीर रेसिपी

Web Summary : गर्मी में कोशिंबीर से पाएं राहत! यह रेसिपी दही को पुदीना, धनिया, अदरक, लहसुन और मसालों से स्वादिष्ट बनाती है। अपनी पसंदीदा सब्जियां मिलाकर ताज़ा और पौष्टिक व्यंजन बनाएं, जो साइड डिश या चटनी के रूप में उत्तम है।

Web Title : Elevate Your Salad: Easy Recipe for Flavorful Yogurt Kosimbir

Web Summary : Beat summer heat with a tasty kosimbir! This recipe transforms plain yogurt into a creamy, flavorful base with mint, cilantro, ginger, garlic, and spices. Add your favorite veggies for a refreshing and nutritious dish, perfect as a side or chutney.