Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > घोसाळ्याचा ठेचा- एकदा खाऊन पाहा, वारंवार आवडीने खाल, घ्या जेवणाला रंगत आणणारी सोपी रेसिपी

घोसाळ्याचा ठेचा- एकदा खाऊन पाहा, वारंवार आवडीने खाल, घ्या जेवणाला रंगत आणणारी सोपी रेसिपी

Ghosalyacha Thecha Recipe: घोसाळ्याचा ठेचा किंवा चटणी ही खरंतर एक पारंपरिक रेसिपी. पण आता थोडी मागे पडत चालली आहे...(how to make ghosalyacha thecha?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2026 14:00 IST2026-03-19T13:59:44+5:302026-03-19T14:00:22+5:30

Ghosalyacha Thecha Recipe: घोसाळ्याचा ठेचा किंवा चटणी ही खरंतर एक पारंपरिक रेसिपी. पण आता थोडी मागे पडत चालली आहे...(how to make ghosalyacha thecha?)

ghosalyacha thecha recipe, how to make ghosalyacha thecha, easy and simple recipe of ghosalyacha thecha | घोसाळ्याचा ठेचा- एकदा खाऊन पाहा, वारंवार आवडीने खाल, घ्या जेवणाला रंगत आणणारी सोपी रेसिपी

घोसाळ्याचा ठेचा- एकदा खाऊन पाहा, वारंवार आवडीने खाल, घ्या जेवणाला रंगत आणणारी सोपी रेसिपी

घोसाळे ही एक भाजी. त्या भाजीची प्रांतानुसार कित्येक वेगवेगळी नावं आहेत. काही ठिकाणी ते गिलके म्हणून ओळखले जातात, तर काही ठिकाणी त्यांना चोपडी दोडकी म्हणतात. त्यांचे बाहेरचे आवरण गुळगुळीत असल्याने चोपडी दोडकी असं नाव पडलं असावं. पण नाव काहीही असलं तरी भाजीसाठी किंवा भजी करण्यासाठी ते प्रामुख्याने ओळखले जातात. आता आपण त्याच घोसाळ्यांचा ठेचा किंवा चटणी कशी करायची ते पाहुया. कारण घोसाळ्याची भाजी केली की अनेकजण नाक मुरडतात. अगदी ताटातही ती घेत नाहीत. असे लोक घोसाळ्याचा चटकदार ठेचा मात्र आवडीने खाऊ शकतील (how to make ghosalyacha thecha?). म्हणूनच बघा चवीत बदल घडवून आणणारी ही खास रेसिपी..(ghosalyacha thecha recipe)

घोसाळ्याचा ठेचा रेसिपी

 

साहित्य

१ मध्यम आकाराचे घोसाळे

७ ते ८ हिरव्या मिरच्या आणि ५ ते ६ लसूण पाकळ्या

फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग आणि १ टीस्पून तीळ

घरच्या भाज्यांना हॉटेलसारखी चव हवी? ५ सोप्या टिप्स- हॉटेलपेक्षाही चटकदार भाज्या करा घरीच

एका लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ

२ टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर

 

कृती

सगळ्यात आधी घोसाळ्यांची सालं काढून टाका आणि त्याचे काप करून घ्या.

आता घोसाळ्याचे काप, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, लसूण मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्या. हे खूप बारीक करू नये. थोडं जाडं- भरडं राहू द्यावं.

मुहुर्ताला सोनं खरेदीची हौस? पाहा स्वस्तात मस्त पर्याय, खिशाला परवडणाऱ्या १ ग्रॅम सोन्यात घ्या 'हे' नाजुक दागिने

यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी, हिंग, तीळ घालून फोडणी करून घ्या. यानंतर त्यात मिक्सरमधून काढलेलं घोसाळं घाला. त्या दाण्याचा कूट, मीठ घालून सगळं व्यवस्थित परतून घ्या.

तेल सुटेपर्यंत हा ठेचा परतून झाला की गॅस बंद करा. भाकरी,  पोळीसोबत घोसाळ्याचा ठेचा किंवा चटणी छान लागते. ही रेसिपी stylishachari या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. 


 

Web Title : तीखी तोरी की चटनी: स्वादिष्टता के लिए एक सरल रेसिपी।

Web Summary : तोरी की चटनी, सब्जी का एक स्वादिष्ट विकल्प, बनाने में आसान है। तोरी, हरी मिर्च और लहसुन को पीस लें। राई, जीरा और तिल के बीज से तड़का लगाएं। मूंगफली पाउडर, नमक, नींबू का रस और धनिया डालें। रोटी या भाकरी के साथ आनंद लें।

Web Title : Spicy Ridge Gourd Relish: A simple recipe for deliciousness.

Web Summary : Ridge gourd relish, a flavorful alternative to the vegetable, is easy to make. Grind ridge gourd, green chilies, and garlic. Temper with mustard seeds, cumin, and sesame seeds. Add peanut powder, salt, lemon juice, and coriander. Enjoy with roti or bhakri.