गणपती बाप्पा एकदम धूमधडाक्यात वाजत गाजत, आनंदात आपल्या घरी येतात. त्यानंतर त्यांच्या सहवासात १० दिवस कसे भुर्रकन उडून जातात हे लक्षातही येत नाही. मग येतो लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस (Ganpati visarjan naivedya). काही जणांच्या घरी तर दिड दिवसांचा, तीन दिवसांचा किंवा ५ दिवसांचा गणपतीही असतो. गणपती बसवताना जसा मोदकांचा मान असतो तसाच मान गणपती विसर्जनाच्या दिवशी शेवयाच्या खिरीला आणि करंजीला असतो. आता शेवयाची खीर करायची म्हटलं की काही जणींना थोडं टेन्शनच येतं. कारण कधी ती अगदीच पातळ होते तर कधी तिच्यातलं गोडाचं प्रमाणच हुकतं (Seviyan kheer or vermicelli kheer recipe). म्हणूनच शेवयाची खीर अगदी परफेक्ट चवीची होण्यासाठी दूध, साखर, शेवया यांचं प्रमाण कसं ठेवायचं ते पाहा..(how to make shevaya kheer?)
शेवयाची खीर करण्याची रेसिपी
साहित्य
१ वाटी शेवया
४ वाट्या दूध
१ ते दिड चमचा तूप
गौरींच्या स्वागतासाठी दारात काढा सुरेख पाऊलं, ७ सुंदर रांगोळी डिझाईन्स, घराला येईल शोभा
काजू, बदाम, पिस्ता यांचे काप एक ते दिड चमचा
अर्धा चमचा मनुकार
७ ते ९ केशराच्या काड्या
पाऊण ते एक वाटी साखर
१ टीस्पून वेलची पूड
कृती
शेवयाची खीर करण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये तूप घाला.
डेबिना बॅनर्जी सांगतेय तिचा अनुभव- मुलांचे केस पातळ असल्यास 'हे' पाणी लावा, केस होतील दाट
तोपर्यंत एका वाटीमध्ये थोडंसं गरम दूध घ्या आणि त्या दुधामध्ये केशराच्या काड्या भिजत घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये शेवया घाला आणि मंद आचेवर थोड्या लालसर होईपर्यंत परतून घ्या. यानंतर शेवया भिजतील एवढंच पाणी कढईमध्ये घाला. शेवया एकदा हलवून घ्या आणि कढईवर झाकण ठेवून वाफ येऊ द्या.
आता दुसरीकडे दूध जरा उकळवून आटवून घ्या. कारण थोडं आटवलेलं दूध घातलं तरच शेवयाच्या खिरीची चव खुलते. दूध आटल्यानंतर त्यामध्ये साखर घाला आणि आता हे दूध ज्या कढईमध्ये शेवया शिजत आहेत, त्यामध्ये घाला.
केशराचं दूध, वेलची पावडर आणि थोड्याशा तुपात तळून घेतलेला सुकामेवा या खिरीमध्ये घाला. ८ ते १० मिनिटे मंद आचेवर खीर उकळली की गॅस बंद करा. अतिशय उत्तम चवीची शेवयाची खीर तयार.. करून पाहा.