Join us

फोडणी जिऱ्याची देताय की सिमेंट आणि कोळशाची? FSSAI चा धक्कादायक खुलासा, जिऱ्यातली भेसळ ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 16:05 IST

Pure cumin test at home : जिऱ्यानं पचनक्रिया सुधारते, गॅस दूर होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जिऱ्याचे आरोग्याला अनेक फायदे तर होतातच, पण यानं आरोग्य बिघडू देखील शकतं. 

Pure cumin test at home : भारतीय किचनमध्ये वेगवेगळे मसाले असतात. यातील एक खास आणि सगळ्यात जास्त वापरला जाणारा मसाला म्हणजे जिरे. याची टेस्ट आणि सुगंध जबरदस्त असते. वेगवेगळ्या भाज्या, पदार्थांना टेस्ट आणि सुगंध देण्यासाठी जिरे टाकलं जातं. टेस्ट देण्यासोबतच जिऱ्यामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणही असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. जिऱ्यानं पचनक्रिया सुधारते, गॅस दूर होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जिऱ्याचे आरोग्याला अनेक फायदे तर होतातच, पण यानं आरोग्य बिघडू देखील शकतं. 

अलिकडेच FSSAI च्या एका रिपोर्टमध्ये खुलासा करण्यात आला की, बाजारात विकल्या जात असलेल्या काही जिऱ्याच्या नमुन्यांमध्ये कोळशाचं पावडर, सीमेंट आणि काचसारख्या गोष्टींची भेसळ आढळून आली आहे. ही भेसळ यासाठी करण्यात आली की, जिरे जड आणि डार्क दिसावं. तसेच व्यापाऱ्यांना जास्त फायदा व्हावा. पण या भेसळयुक्त जिऱ्याचा थेट प्रभाव पचनतंत्र, लिव्हर, किडनी आणि एकंदर आरोग्यावर पडू शकतो.

भेसळयुक्त जिरे काय करतं नुकसान?

अनेक एक्सपर्ट सांगतात की, जिऱ्यामध्ये करण्यात आलेल्या भेसळीनं पचनतंत्र, किडनी आणि लिव्हरचं नुकसान होऊ शकतं. कोळशाच्या पावडरनं पोटाच्या आतील थर जळू शकतो, तर सीमेंटनं शरीरात टॉक्सिन जमा होतात, ज्यामुळे किडनी डॅमेज होऊ शकते. त्याशिवाय भेसळयुक्त जिरे खाल्ल्यानं अॅसिडिटी, अपचन, प्लोटिंग आणि आतड्यांवर सूज अशा समस्याही होतात. तसेच वेगवेगळ्या गंभीर आजारांचा धोकाही वाढतो.

भेसळ कशी ओळखावी?

पाण्याची टेस्ट

एक ग्लास पाणी घ्या त्यात थोडं जिरं टाका. ओरिजनल जिरं पाण्यावर तरंगत तर भेसळयुक्त जिरं ज्यात सीमेंट किंवा कोळशाचं पावडर असेल ते पाण्यात खाली जाऊन बसतं.

हातावर घासा

जिऱ्याचे काही दाणे हातावर घासा. जर काळा रंग किंवा पावडर निघत असेल तर यात भेसळ केलेली असू शकते. कारण ओरिजनल जिऱ्यातून कोणताही रंग निघत नाही.

गंध

ओरिजनल जिऱ्याचा सुगंध तिखट आणि ताजा असतो. भेसळयुक्त जिऱ्याला गंध नसतो किंवा केमिकलचा गंध येऊ शकतो.

या छोट्या छोट्या टेस्ट घरीच करून तुम्ही जिऱ्यात भेसळ केली आहे की नाही हे जाणून घेऊ शकता आणि तुमचं आरोग्य चांगलं ठेवू शकता.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स