Join us

पावसाळ्यात कारल्यासोबत 'या' गोष्टी खाण्याने बिघडते तब्येत, उगाच प्रयोगाच्या नादात पकडू नका बेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 13:20 IST

Monsoon Foods Tips : खासकरून पावसाळ्यात खाण्या-पिण्यासंबंधी खूप काळजी घ्यावी लागते. कारण आपण जे काही खातो त्याचा थेट प्रभाव आपल्या आरोग्यावर पडतो. 

Monsoon Foods Tips : पावसाचा मौसम हा भिजायला किंवा फिरायला रोमॅंटिक वाटत असला तरी आरोग्यासाठी घातकच असतो. कारण पावसाळ्यात वातावरण बदलामुळे वेगवेगळे गंभीर आजार डोकं वर काढतात. सर्दी-खोकला तर कॉमन आहे. पण डेंग्यू, मलेरिया, डायरिया, पचनसंबंधी समस्या, जुलाब, ताप अशा समस्या खूप वाढतात. त्यामुळे खासकरून पावसाळ्यात खाण्या-पिण्यासंबंधी खूप काळजी घ्यावी लागते. कारण आपण जे काही खातो त्याचा थेट प्रभाव आपल्या आरोग्यावर पडतो. 

कारली तशी आरोग्यासाठी चांगली असतात. भरपूर लोक नियमितपणे कारल्याचा ज्यूस पितात, तर काही लोक वेगवेगळ्या पद्धतीची भाजी बनवून खातात. पण पावसाळ्यात कारल्यांसोबत काही गोष्टी खाणं टाळणं तब्येतीसाठी चांगलं असतं. कारण या गोष्टी कारल्यासोबत मिळून आरोग्याचं नुकसान करू शकतात. चला तर पाहुया कोणत्या गोष्टी कारल्यासोबत खाऊ नयेत.

दही

दही हे खायला तर टेस्टी असतंच, सोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतं. लोक वेगवेगळ्या पद्धतीनं दही खातात. पण दही कारल्यासोबत कधीच खाऊ नये. कारण यानं तुम्हाला त्वचेसंबंधी समस्या होण्याचा धोका असतो.

आंबे

पावसाचा जोर वाढला असला तरी बरेच लोक अजूनही आंब्यांचा आनंद घेत आहेत. बरेच लोक जेवणासोबत आंबा कापून खातात. पण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की, कारल्याच्या भाजीसोबत आंबा कधीच खाऊ नये. कारण असं केल्यास पोटासंबंधी समस्या होऊ शकतात.

दूध

कारली आणि दूध एकत्र कधीही आहारात असू नये. कारण या दोन्हीच्या कॉम्बिनेशननं बद्धकोष्ठतेची समस्या होण्याची शक्यता असते. पोटात जळजळ किंवा अपचन यांचाही सामना करावा लागू शकतो. दूध पिण्यात आणि कारली खाण्यात काही तासांचा गॅस असला पाहिजे.

भेंडी

सध्या पालेभाज्यावरील कीटक, कीटकनाशक अधिक राहतात. त्यामुळे पावसाळ्यात बरेच लोक भेंडीची भाजी भरपूर खातात. पण कारली आणि भेंडी कधीच एकत्र खाऊ नये. यानं पचनासंबंधी समस्या होण्याचा धोका असतो.

टॅग्स :अन्नमोसमी पाऊसहेल्थ टिप्स