बरेचदा आपल्या घरात भाजी नेहमीच थोडी जास्तीची तयार केली जाते. काहीवेळा ही भाजी लगेच संपते तर कधी जास्तीची भाजी उरते, अशी शिल्लक राहिलेली भाजी आपण शक्यतो फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खातो. आपल्यापैकी अनेकांच्या घरात वेळेची बचत करण्यासाठी किंवा अन्नाची नासाडी टाळण्यासाठी उरलेली भाजी दुसऱ्या दिवशी किंवा पुन्हा पुन्हा गरम करून खाण्याची सवय असते. पहिल्यांदा गरम केलेली भाजी चविष्ट लागते, पण जेव्हा तुम्ही तीच भाजी वारंवार गरम करता, तेव्हा त्याचे परिणाम तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात(which foods turn toxic when reheated).
खरंतरं, दररोज भाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, परंतु एकदा तयार करून मग ती भाजी स्टोअर करून वारंवार गरम करून खाणे आपल्यासाठी हानिकारक (What food when reheated becomes poisonous) ठरु शकते. या भाज्यांमधील अनेक पोषक घटक पुन्हा गरम केल्यामुळे नष्ट होतात आणि काही घटक विषारी होऊ शकतात. जर तुम्हीही असे करत असाल, तर तुम्हाला ही सवय बदलण्याची गरज आहे, अन्यथा आरोग्याला गंभीर नुकसान पोहोचू शकते. अशा भाज्या खाल्ल्याने अन्न विषबाधा, पोटदुखी, जुलाब, अॅसिडिटी, उलट्या, गॅस आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. यासाठीच, नेमक्या कोणत्या भाज्या वारंवार गरम करु नयेत किंवा फ्रिजमध्ये ठेवल्यास विष (foods that should not be reheated) बनू शकते ते पाहूयात.
१. कोणती भाजी पुन्हा गरम केल्यावर विषारी बनते ?
काही भाज्यांमध्ये असे घटक असतात, जे वारंवार गरम केल्यावर तुटून हानिकारक कंपाऊंड्स तयार करतात. विशेषतः नायट्रेट असलेल्या भाज्या पुन्हा गरम केल्यावर नायट्राइट मध्ये बदलतात, जे शरीरासाठी धोकादायक मानले जातात. यामध्ये सर्वात जास्त धोका पालक, मेथी, कोबी, इतर हिरव्या पालेभाज्या आणि बटाटा या भाज्यांमध्ये असतो. या भाज्यांमध्ये असलेले नायट्रेट पुन्हा गरम केल्यावर नायट्राइटमध्ये बदलते. यामुळे शरीरात मेथेमोग्लोबिनेमिया सारखी समस्या उद्भवू शकते, ज्यामध्ये रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. ज्यामुळे चक्कर येणे, अशक्तपणा, उलट्या आणि लहान मुलांमध्ये ब्लू-स्किन सिंड्रोम पर्यंतचा त्रास होऊ शकतो. याव्यतिरिक्त, फूड पॉयजनिंगचा धोकाही असतो.
हुडहुडी भरवणारी थंडी विसरा! कणकेत ४ पदार्थ कालवून करा पौष्टिक चपाती, वाढेल रोगप्रतिकारकशक्ती...
कोणत्या भाज्या पुन्हा - पुन्हा गरम करु नयेत ?
१. पालक :- अनेकदा घरात आपण उरलेली भाजी दुसऱ्या दिवशी फ्रिजमधून काढून गरम करून खातो, पण प्रत्येक भाजी पुन्हा गरम करणे योग्य नाही. पालक ही देखील अशीच एक भाजी आहे. पालक भाजीला वारंवार पुन्हा गरम केल्यास नायट्राइटचे प्रमाण वेगाने वाढते आणि आरोग्याला गंभीर नुकसान पोहोचू शकते.
वाटीभर तांदुळाचा करा नीर डोसा! ना पीठ फुलून येण्याची झंझट, ना तेलाची गरज - तरीही डोसा होईल बेस्ट...
२. बटाटा :- बटाट्यामध्ये असलेले स्टार्च पुन्हा गरम केल्यावर तुटून टॉक्सिक कंपाऊंड्स असा विषारी घटक तयार करू लागते. यामुळे फूड - पॉयजनिंगचा धोका वाढू शकतो. यासाठीच, बटाट्याची भाजी किंवा इतर भाज्यांमध्ये बटाटा घातला असेल तर अशा भाज्या सुद्धा पुन्हा गरम करण्याची चूक करू नये.
३. मशरूम :- मशरूम ही आरोग्याच्या दृष्टीने खूप पौष्टिक आणि फायदेशीर भाजी मानली जाते, पण जर तुम्ही या भाजीला पुन्हा गरम करून खाल्ले, तर गंभीर नुकसान होऊ शकते. मशरूममधील प्रोटीन्स पुन्हा गरम केल्यावर बदलतात आणि पोटात जडपणा, गॅस आणि उलट्या यासारख्या समस्या होऊ शकतात.
फ्रिजमध्ये कोणते पदार्थ ठेवल्यास विषारी बनू शकतात ?
१. उरलेल्या पालेभाज्या :- पालक, मेथी आणि मोहरी यांसारख्या भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील नायट्रेट वाढून काही तासांतच नायट्राइटमध्ये बदलू लागतात, जे हानिकारक असते.
२. कापलेली फळे आणि सॅलॅड :- कापलेली फळे आणि सॅलॅड जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवल्यास बॅक्टेरिया वेगाने वाढतात आणि फूड-पॉयजनिंगचा धोका वाढतो.
३. शिल्लक उरलेला थंड भात :- थंड झालेल्या भातामध्ये बॅसिलस सेरेउस (Bacillus Cereus) नावाचे बॅक्टेरिया वेगाने वाढतात, जे फ्रिजमध्ये भात ठेवल्यासही त्यांची वाढ वेगाने होते. एकदा हा भात खाल्ल्यास उलट्या आणि जुलाब यांसारख्या समस्या येऊ शकतात.
४. उकडलेले पदार्थ :- उकडलेले बटाटे, उकडलेली डाळ यांसारख्या अन्नपदार्थांमध्ये बॅक्टेरिया वेगाने वाढतात आणि चुकीच्या पद्धतीने फ्रिजमध्ये स्टोअर केल्यास ते सहजपणे विषारी होऊ शकतात.
Web Summary : Reheating certain vegetables like spinach, potatoes, and mushrooms can be harmful. Nitrates convert to nitrites, causing health issues. Avoid re-heating leftover cooked rice and cut fruits to prevent food poisoning.
Web Summary : पालक, आलू और मशरूम जैसी कुछ सब्जियों को दोबारा गर्म करना हानिकारक हो सकता है। नाइट्रेट्स नाइट्राइट्स में परिवर्तित हो जाते हैं, जिससे स्वास्थ्य संबंधी समस्याएं होती हैं। बचे हुए पके चावल और कटे फलों को दोबारा गर्म करने से बचें।