Join us  

Food Tips : खरंच एक घास ३२ वेळा चावून खायचा असतो? पोषण तज्ज्ञांनी सांगितलं या मागचं लॉजिक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 4:00 PM

Food Tips : चांगलं चघळण्यामुळे, आपल्या शरीराला अन्न  लागतं आणि आपण देखील कमी खातो. आता आपण किती वेळा अन्न चावायला पाहिजे हा प्रश्न आहे. तर मग याबद्दल जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात जाणून घेऊया.

ठळक मुद्देतज्ज्ञांचे म्हणणे आहे की आपले अन्न योग्य प्रकारे चर्वण केल्याने आपल्याला अन्नामधून मिळणार्‍या पोषक द्रव्यांचे प्रमाण वाढण्यास मदत होते. जेवताना आपले ओठ बंद  ठेवून अन्न चावा. जेवताना जबड्याची व्यवस्थित हालचाल व्हायला हवी. हळूहळू जेवा, जेवताना शक्य झाल्यास ३२ वेळा मोजा. जेवण करताना व्यवस्थित चघळण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून पचनसंस्था चांगली राहिल. 

तुम्ही बर्‍याच लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की अन्न घाई घाईत न गिळता हळू हळू चर्वण करा. कारण आपण जे काही खातो त्याचा आपल्या पोट आणि आतड्यांशी संबंध आहे. पचन प्रक्रियेची संपूर्ण प्रक्रिया तोंडात घास चघळण्यापासून सुरू होते. हा पचनाचा पहिला टप्पा मानला जातो. तज्ञांच्या मते, जेव्हा आपण अन्न चवता तेव्हा त्याचे लहान लहान तुकडे होत जातात. 

जेव्हा लाळ या लहान तुकड्यांसह मिसळली जाते, तेव्हा पुढील प्रक्रियेसाठी ती आतड्यांमध्ये  पाठविली जाते. चांगलं चघळण्यामुळे, आपल्या शरीराला अन्न  लागतं आणि आपण देखील कमी खातो. आता आपण किती वेळा अन्न चावायला पाहिजे हा प्रश्न आहे. तर मग याबद्दल जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात जाणून घेऊया.

तज्ज्ञ अन्न गिळण्याआधी ३२ वेळा चावण्याचा सल्ला देतात. नरम आणि पाणीयुक्त जेवण कमीत कमी चावावं लागतं. अन्न लहान लहान तुकड्यात  चावलं जावं यासाठी यासाठी चावायचं.  ज्या पदार्थांना खाणं कठीण आहे. नट्स, ड्रायफ्रुट्स असे पदार्थ ४० वेळा चावले जाऊ शकतात. खाद्यपदार्थ जितके कडक, कठीण असतात  तितकेच जास्त ते चघळण्याची आवश्यकता  जास्त असते.

हळूहळू जेवण्याचे फायदे काय आहेत?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आपले अन्न योग्य प्रकारे चर्वण केल्याने आपल्याला अन्नामधून मिळणार्‍या पोषक द्रव्यांचे प्रमाण वाढण्यास मदत होते. एका अभ्यासानुसार असे आढळले आहे, की 20-40 वेळा बदाम चघळण्यामुळे केवळ भूक भागत नाही तर बदामातील पोषकद्रव्ये पुरेपूर मिळण्यास मदत होते.

अन्न व्यवस्थित चावल्यास पचनप्रणाली अन्न पचवण्यासाठी मदत करते.

32 वेळा अन्न चावण्याचा एक फायदा म्हणजे आपण बर्‍याच वेळासाठी अन्नाची चव घेऊ शकता.

बराच वेळ अन्न चघळण्यामुळे अधिक पोषक आणि ऊर्जा शोषण्यास मदत होते.

आपण जितक्या वेळा अन्न चर्वण कराल तितके निरोगी आपण फिट राहाल.

खाण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे  अन्न शरीराला लागत नाही. म्हणून जेवताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं हे माहित असायला हवं.  आपला चमचा किंवा काटा पूर्ण भरू नका. तोंडात चमचा घालताना अन्न बाहेर पडणार नाही याची काळजी घ्या. अन्न व्यवस्थित चघळण्यामुळे, अन्न बर्‍याच तुकड्यांमध्ये तुटते आणि लाळेसह अन्ननलिकेत जाते. अन्न चघळणे आपल्या दातांच्या आरोग्यासाठी चांगले आहे.  जेव्हा अन्न योग्य प्रकारे चावले जाते तेव्हा दातांचा व्यायाम होतो.

तेव्हा आतड्यांमध्ये बॅड बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता फारच कमी असते. जेवताना आपले ओठ बंद  ठेवून अन्न चावा. जेवताना जबड्याची व्यवस्थित हालचाल व्हायला हवी. हळूहळू जेवा, जेवताना शक्य झाल्यास ३२ वेळा मोजा. जेवण करताना व्यवस्थित चघळण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून पचनसंस्था चांगली राहिल. 

जेवताना अशी घ्या काळजी

जेवणाच्या ३० मिनिटं आधी आणि ३० मिनिटं नंतर पाणी प्या. जेवताना शक्यतो जास्त पाणी पिणं टाळा. त्यामुळे पचनाची क्षमता वाढू शकेल. जेवल्यानंतर लगेच कॉफी पिऊ नका. यामुळे पचनास विलंब  झाल्यानं सतत लघवी येऊ शकते. 

जेवणानंतर  गोड खाणं टाळा. गोड पदार्थ त्वरीत पचतात आणि गॅस आणि सूजेचे कारण ठरतात, जेवल्यानंतर लगेच व्यायाम करू नका, उकळलेल्या कमी मसाल्याच्या भाज्यांचे सेवन करा. पचन चांगले होण्यासाठी हे गरजेचं आहे, जेवल्यानंतर फिरायला जा.

जेव्हा आपण अन्न पुरेसे चावत नाही, तेव्हा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.  आपले शरीर आवश्यक एंजाइम तयार करीत नाही. यामुळे सूज येणे, अतिसार, पोटाची जळजळ, चिडचिडेपणा आंबट ढेकर येणं, गॅस यासारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यअन्न