'किस बाई किस, दोडकं किस, दोडक्याची फोड लागते गोड...' हे गाणं आता श्रावणातल्या मंगळवारी अर्थात मंगळागौरीला कानावर पडेल. पण प्रश्न पडतो, दोडकी किसून नक्की काय रेसेपी करत असतील पूर्वीच्या बायका? अलीकडे रील बघताना मिळालं त्याचं उत्तर... किसलेल्या दोडक्याची भाजी!
अं...हं...नाक मुरडू नका! रेसेपी एकदा करून बघाल तर नेहमीसाठी आपल्या बकेट लिस्ट मध्ये ऍड कराल! काही भाज्या झटपट होणाऱ्या असतात पण घरच्यांच्या पसंतीस उतरत नाहीत, त्यातच नावडत्या भाज्यांच्या यादीत असते दोडकी! तिला आवडत्या भाज्यांच्या यादीत शिफ्ट करायचे असेल तर ही रेसेपी नक्की ट्राय करून बघा.
किसलेल्या दोडक्याची भाजी
साहित्य : दोडकी, चिरलेला कांदा, हळद, कढीपत्ता, मोहरी, जिरे, लसूण, मिरची, शेंगदाण्याचे कूट, कोथिंबीर
कृती :
>> सर्वप्रथम दोडक्याची सालं काढून ती किसून घ्या.
>> लसणाच्या आठ-दहा पाकळ्या, जिरे, चार मिरच्यांबरोबर वाटून घ्या.
>> फोडणीमध्ये मोहरी, कढीपत्ता, लसूण मिरची ठेचा, चिरलेला कांदा परतून घ्या.
>> हिंग, हळद आणि दोडक्याचा किस टाकून परतून घ्या.
>> भाजी परतून झाली की त्यात शेंगदाण्याचे कूट घाला.
>> दोन वाफा काढून भाजी छान शिजवून घ्या आणि वर बारीक चिरलेल्या कोथिंबिरीची पेरणी करा.
>> पोळी किंवा भाकरी बरोबर ही चटपटीत भाजी सर्व्ह करा.
पहा प्रत्यक्ष कृती -