Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > खाण्यापिण्याच्या पाकिटावर ‘हे’ रंगबिरंगी ठिपके म्हणजे केवळ डिझाइन नाही, त्यात दडलेला असतो तब्येतीचा लेखाजोखा

खाण्यापिण्याच्या पाकिटावर ‘हे’ रंगबिरंगी ठिपके म्हणजे केवळ डिझाइन नाही, त्यात दडलेला असतो तब्येतीचा लेखाजोखा

Food Packets Interesting Facts : खाण्या-पिण्याच्या वस्तू असलेल्या पॅकेट्सवर वेगवेगळ्या रंगांचे काही लेबल दिलेले असतात. हे रंगीत लेबल आपल्याला दर्शवतात की, पॅकेटमधील पदार्थात काय आहे आणि आरोग्यासाठी योग्य आहे की अयोग्य.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 13:41 IST2026-01-30T13:22:47+5:302026-01-30T13:41:41+5:30

Food Packets Interesting Facts : खाण्या-पिण्याच्या वस्तू असलेल्या पॅकेट्सवर वेगवेगळ्या रंगांचे काही लेबल दिलेले असतात. हे रंगीत लेबल आपल्याला दर्शवतात की, पॅकेटमधील पदार्थात काय आहे आणि आरोग्यासाठी योग्य आहे की अयोग्य.

Food Packets Interesting Facts : Food label colour code on packed items and their meaning | खाण्यापिण्याच्या पाकिटावर ‘हे’ रंगबिरंगी ठिपके म्हणजे केवळ डिझाइन नाही, त्यात दडलेला असतो तब्येतीचा लेखाजोखा

खाण्यापिण्याच्या पाकिटावर ‘हे’ रंगबिरंगी ठिपके म्हणजे केवळ डिझाइन नाही, त्यात दडलेला असतो तब्येतीचा लेखाजोखा

Food Packets Interesting Facts : पूर्वी दुकानातून पदार्थ किंवा वस्तू घेतल्या तर कागदांमध्ये बांधून दिल्या जात होत्या. पण हल्ली एखाद्या मॉलमध्ये, सुपर मार्केटमध्ये किंवा दुकानात गेल्यावर खाण्या-पिण्याच्या वस्तू पॅकेटमध्ये मिळण्याचा ट्रेंड चांगलाच वाढला आहे. पॅकेटमधील पदार्थांकडे एक स्टेटस म्हणून सुद्धा बघितलं जातं. आपणही अनेकदा पॅकेटमधील खाद्य-पदार्थ खरेदी केले असतील. अशात या पॅकेट्सवरील एका गोष्टीकडे नक्कीच लक्ष दिलं असेल. ती म्हणजे या पॅकेट्सवर वेगवेगळ्या रंगांचे काही लेबल दिलेले असतात. हे रंगीत लेबल आपल्याला दर्शवतात की, पॅकेटमधील पदार्थात काय आहे आणि आरोग्यासाठी योग्य आहे की अयोग्य. लाल, हिरव्या, पिवळ्या, काळ्या, गुलाबी रंगांचे हे लेबल वेगवेगळ्या प्रकारची महत्वाची माहिती देत असतात. पण अनेकांना त्यांचा अर्थ माहीतच नसतो. तोच आज आपण समजून घेणार आहोत.

हिरवी आणि लाल खूण

हिरवी खूण - पॅकेटवरील हिरवी खूण हे दर्शवते की, यातील प्रॉडक्ट पूर्णपणे शाकाहारी आहे. यात मांस, अंडी किंवा प्राण्यांसंबंधी कोणतेची तत्व नाहीत.

लाल खूण - लाल खूण दर्शवते की, यातील प्रॉडक्ट नॉन-व्हेजिटेरिअन आहे. जर आपण व्हेजिटेरिअन असाल तर याकडे लक्ष द्यायला हवं. जास्तीत जास्त लोकांना पॅकेटवरील लाल आणि हिरव्या खूणा माहीत असतात. पण इतरही रंगांच्या खूणा यावर असतात. त्यांचा अर्थ पाहुयात. 

काळी खूण

पॅकेटवर काळ्या रंगाच्या खूणेचा अर्थ होतो की, त्यात मोठ्या प्रमाणात केमिकल्स आहेत. हे टेस्ट वाढवण्यासाठी, पदार्थांना रंग देण्यासाठी किंवा ते जास्त काळ टिकून राहण्यासाठी टाकले जातात. असे पदार्थ जास्त खाणं आरोग्यासाठी घातक असतं. एक्सपर्ट सांगतात की, काळी खूण असलेल्या पॅकेट्समधील पदार्थ जास्त खाल्ले तर पचन तंत्र, लिव्हर आणि किडनीमध्ये बिघाड होऊ शकतो. तसेच वेगवेगळ्या आजारांचा धोकाही वाढतो. त्यामुळे यापुढे पॅकेटमधील फूड घेताना या खूणेकडे नक्की बघा.

निळी खूण

पॅकेटवरील निळी खूण दर्शवते की, यातील प्रॉडक्ट औषध आहे. याचा अर्थ याचा वापर आजारात केला जाऊ शकतो. पण तोही सुद्धा केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच.

पिवळी खूण

पिवळ्या रंगाची खूण दर्शवते की, यातील प्रॉडक्टमध्ये अंडी घातली आहेत. बरेच लोक अंडी खात नाहीत, त्यांच्यासाठी ही खूण खूप महत्वाची ठरते. बऱ्याचदा पिवळ्या रंगाची खूण आर्टिफिशिअल रंग किंवा फ्लेवर मिक्स असलेल्या पॅकेट्सवरही असते. 

त्यामुळे आता यापुढे कधी आपण बाहेरून पॅकेटमधील खाद्यपदार्थ खरेदी कराल, तेव्हा त्यावरील या रंगांच्या खूणा आवर्जून बघा. जर याकडे दुर्लक्ष केलं तर आरोग्याचं नुकसान होण्याचा धोका होऊ शकतो.

Web Title : फूड पैकेट लेबल: रंग बताते हैं स्वास्थ्य संबंधी ज़रूरी जानकारी

Web Summary : फूड पैकेट के लेबल हरे (शाकाहारी), लाल (मांसाहारी), काले (उच्च रसायन), नीले (औषधीय) और पीले (अंडा/कृत्रिम) जैसे रंगों का उपयोग करते हैं। ये रंग सामग्री और संभावित स्वास्थ्य जोखिमों का संकेत देते हैं। सूचित विकल्पों के लिए लेबल ध्यान से जांचें।

Web Title : Decoding Food Packet Labels: Colors Reveal Health Information You Need

Web Summary : Food packet labels use colors like green (vegetarian), red (non-vegetarian), black (high chemicals), blue (medicinal), and yellow (contains egg/artificial). These colors indicate ingredients and potential health risks. Check labels carefully for informed choices.