लहानपणी शाळेच्या बाहेर मस्त वेगवेगळ्या प्रकारचा खाऊ मिळायचा. त्यापैकी एक सगळ्यांचा आवडीचा खाऊ म्हणजे चिंचेची गोळी. (Food for kids!! Very easy to make Imli Candy, sweet and sour candy for kids)आजकाल दुकानांमध्ये ही गोळी फार दिसत नाही. मस्त आंबट गोड अशी ही चिंच गोळी मिटक्या मारत खाण्याची मज्जाच काही वेगळी होती. अगदी त्याच चवीची गोळी घरी करता आली तर?चिंच गोळी करणे तसे सोपे आहे. ही रेसिपी पाहा अगदी तशीच करुन मुलांना खायला द्या. (Food for kids!! Very easy to make Imli Candy, sweet and sour candy for kids)त्यांनाही सांगा तुम्ही शाळेत काय खाऊ आवडीने खाल्ला.
कृती
१. एका भांड्यामध्ये ५० ग्रॉम चिंच भिजत ठेवा. भिजवण्यासाठी गरम पाणी वापरा. तेवढाच गुळही बारीक किसून घ्या. जेवढी चिंच वापराल तेवढाच गूळ वापरायचा.
२. अर्ध्या तासासाठी चिंच भिजवली तरी पुरेशी असते. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्यासकट चिंच टाका. त्याची एकदम बारीक पेस्ट करुन घ्या. सगळं वाटलं जाईल याची काळजी घ्या. एका पातळ फडक्याचा वापर करुन किंवा गाळणीचा वापर करुन चिंचेचा कोळ गाळून घ्या. चोथा टाकून द्या.
३. एका कढईमध्ये किंवा खोलगट पॅनमध्ये चमचाभर तूप घ्या. तूप जरा वितळले की त्यामध्ये चिरलेला गूळ टाका आणि ढवळत राहा. ढवळायचे थांबलात तर गूळ करपेल आणि चिकटेल त्यामुळे सतत ढवळत राहा.
४. गूळ वितळला की त्यामध्ये उकळी येईल. त्यानंतर त्यामध्ये चिंचेची पेस्ट ओता. व्यवस्थित ढवळा मिक्स करुन घ्या. जरा पाच मिनिटांनी मिश्रण आटायला लागेल. मग त्यामध्ये चमचाभर तूप घाला. आणि व्यवस्थित परतून घ्या.
५. मिश्रणामध्ये चमचाभर जिरे पूड घाला. तसेच लाल तिखट घाला. चवीपुरते सैंधव मीठ घाला. सगळं व्यवस्थित एकजीव करुन घ्या. मिश्रण छान घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. ते गार करत ठेवा.
६. हाताला तूप लावा आणि मग मिश्रणाच्या गोळ्या करून घ्या. अति मोठी गोळी करु नका. मध्यम आकाराच्या गोळ्या करा. एका वाटीमध्ये पिठीसाखर घ्या. गोळी वळून झाली की पिठीसाखरेमध्ये घोळवून घ्या. आणि एका ताटामध्ये लावून ठेवा. सगळ्या गोळ्या तयार करुन झाल्यावर त्या जरा उन्हामध्ये ठेवा. किंवा पंख्याखाली वाळवा. हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवा.