महाराष्ट्रातील अनेक भागात विविध चटण्या बनवून खाल्ल्या जातात. खोबरे, लसूण, कढीपत्ता, तीळ यांसारख्या विविध चटण्यांची चव आपण चाखलीच असेल.(flaxseed sesame chutney recipe) गरमागरम वरण भातासोबत तोंडी लावायला आपल्याला काहींना काही हवे असते. ना आवडती भाजी असली की, आपण चटणीवर ताव मारुन अगदी भात, भाकरी किंवा चपातीसोबत खातो.(daily diet for women’s health) ज्यामुळे आपल्या जेवणाची रंगत आणखी वाढते. यातल्या काही चटण्या या आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या असतात. (ayurvedic remedy for bones and digestion)जवस आणि तीळाचे फायदे आपल्यापैकी अनेकांना माहित असेलच.(natural cure for joint pain in women) हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जवसामुळे पचनक्रिया सुधारते. रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.(women wellness food tips) तिळाचे नियमितपणे सेवन केल्यास हाडे मजबूत होतात, त्वचेचा पोत सुधारतो आणि रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. हाडं बळकट करण्यासाठी, मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी ही चटणी खायला हवी.(seeds that boost female health) आपल्या शरीराला चांगले पोषण मिळावे, कॅल्शियम, ओमेगा-3 फॅटी ऍसिडस आणि फायबर यांसारखे घटक यामध्ये आहेत. अवघ्या काही मिनिटांत तयार होणारी रेसिपी कशी बनवायची पाहूया. (healthy chutney recipe for daily use)
तळल्यानंतर फ्रेंच फ्राईज नरम पडतात? सोपी ट्रिक, पावसाळ्यातही खाता येतील कुरकुरीत फ्राईज
साहित्य जवस - १ वाटी शेंगदाणे - १/२ वाटीतीळ - १/२ वाटीसुके खोबरे - १/२ वाटीकढीपत्ता - मूठभर चण्याची पांढरी डाळ - १/२ वाटीजिरे - २ चमचे लसूण - २० ते २२ सुकी लाल मिरची - ५ ते ७ मीठ - १ चमचा मिरची पावडर - १ चमचा चाट मसाला - १ चमचा
कृती
1. सगळ्यात आधी जवळ चाळून घ्या. त्यानंतर त्याला दोन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ करा. त्यातील सगळं पाणी नितरल्यानंतर कढईमध्ये खरपूस भाजून घ्या. जवस धुतल्यामुळे अतिशय खमंग भाजले जातात आणि टेस्ट ही खूप छान लागते. जवस पूर्ण कोरडे होईस्तोवर चांगले भाजा. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या.
2. आता पॅनवर शेंगदाणे, तीळ, खोबरे, कढीपत्ता, डाळ, जिरे, लसूण आणि लाल मिरच्या वेगवेगळे भाजून घ्या.
3. मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले सर्व साहित्य, मीठ, मिरची पावडर आणि चाट मसाला घालून वाटून घ्या.
4. एका हवाबंद डब्यात घालून साठवून ठेवा. भात- भाकरी किंवा चपातीसोबत आवडीने खा.