Join us

१ कप साबुदाणा - १ बटाटा, करा एकादशी स्पेशल साबुदाणा नगेट्स - साबुदाणा न भिजवता झटपट प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2023 16:29 IST

Farali Potato Nuggets, Potato Nuggets For Ekadashi Upvas आता साबुदाणा भिजवायची गरज नाही, करा स्पेशल कुरकुरीत साबुदाणा नगेट्स..

उपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी आठवते. साबुदाणा खाण्याचा एक खवय्यावर्ग आहे. काहींना साबुदाण्याची खिचडी आवडते, तर काहींना नाही. साबुदाणा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. साबुदाणा हा फायबर, फॉस्फरस, पोटॅशियमचा एक उत्तम स्रोत आहे. साबुदाण्याचे अनेक प्रकार केले जातात.

साबुदाणा खिचडी, साबुदाण्याचे पापड, साबुदाण्याची खीर, पण आपण कधी साबुदाण्याचे नगेट्स ही रेसिपी ट्राय करून पाहिली आहे का? एक बटाटा व वाटीभर साबुदाण्यापासून ही रेसिपी करण्यात येते. कमी साहित्यात - कमी वेळात ही रेसिपी तयार होते. चला तर मग या हटके कुरकुरीत रेसिपीची कृती पाहूयात(Farali Potato Nuggets, Potato Nuggets For Ekadashi Upvas).

साबुदाणा नगेट्स करण्यासाठी लागणारं साहित्य

साबुदाणा

बटाटा

हिरवी मिरची

जेवताना तोंडी लावण्यासाठी करा कांद्याच्या ४ प्रकारच्या चटपटीत चटण्या, ५ मिनिटांत चविष्ट चटणी

मीठ

पाणी

तेल

कृती

सर्वप्रथम, एक वाटी साबुदाणा मिक्सरमधून वाटून घ्या. त्याची बारीक पावडर करा. साबुदाण्याची बारीक पावडर करून झाल्यानंतर त्यात एक चिरलेला बटाटा, आवडीप्रमाणे मिरच्या, चवीनुसार मीठ, एक कप पाणी घालून पेस्ट तयार करून घ्या. ही तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा.

सिमला मिरचीची चविष्ट चटणी खाऊन तर पाहा, रेसिपी सोपी - तोंडाला येईल चव

दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात नगेट्स तळून घ्या. सोनेरी रंग आल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून ठेवा. अशा प्रकारे साबुदाणा नगेट्स  खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स