Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाट्टेल तेव्हा फळं खाल्ली तर हमखास बिघडते पोट, वाढते शुगर, पाहा फळं खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 19:59 IST

Fruits Eating Right Time : बऱ्याचदा लोकांना फळ कसं खावं हे माहीत नसतं किंवा फळं खाण्याची योग्य वेळ माहीत नसते. त्यामुळे त्या फळातील पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत आणि चुकीच्या वेळी खाल्ल्यास काही समस्याही होतात.

Fruits Eating Right Time : फळं ही आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे. डॉक्टर नेहमीच वेगवेगळी फळं खाण्याचा सल्ला देत असतात. कारण या फळांमधून आपल्या शरीराला भरपूर आवश्यक पोषक तत्व मिळतात. पण बऱ्याचदा लोकांना फळ कसं खावं हे माहीत नसतं किंवा फळं खाण्याची योग्य वेळ माहीत नसते. त्यामुळे त्या फळातील पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत आणि चुकीच्या वेळी खाल्ल्यास काही समस्याही होतात. आयुर्वेदानुसार, कोणतंही फळ खाण्याची एक पद्धत असते.

फळ जर तुम्ही योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी खाल्लं नाही तर आरोग्यासाठी ते नुकसानकारक ठरू शकतं. असं लॉन्जेविटी एक्सपर्ट प्रशांत देसाई यांनी एका इन्स्टा पोस्टच्या माध्यमातून सांगितलं. ते म्हणाले की, फळं खाण्याची एक पद्धत आणि योग्य प्रमाण असतं. याकडे दुर्लक्ष करणं किंवा ते फॉलो न करणं नुकसानकारक ठरू शकतं. चला जाणून घेऊ त्यांनी काय सांगितलं.

कसं खावं फळ?

एक्सपर्टनुसार, कधी कोणतंही फळ हे पूर्ण खावं. जर त्याची साल खाण्यायोग्य असेल तर ती सुद्धा खावीत. कारण कधी कधी यात जास्त फायबर आणि इतर पोषक तत्व असतात. एक फळ जर पूर्ण खात नसाल तर 50 वयापर्यंत निरोगी आणि फिट राहणं अवघड होऊ शकतं.

फळ खाण्याची योग्य पद्धत?

बरेच लोक सकाळी  उपाशीपोटी नाश्त्यामध्ये केवळ फळं खातात. पण असं करणं नुकसानकारक ठरू शकतं. कारण यामुळे शरीरात फार जास्त ग्लूकोज स्पाइक ग्लायकेशन होऊ शकतं. त्यामुळे फळं कधीही काही नट्स, चीज किंवा योगर्ट सोबत खावीत. याने शुगर स्पाइक कमी होईल. उपाशीपोटी आंबट फळं कधी खाऊ नये. याने पोटात गॅसची समस्या होऊ शकते.

फ्रूट ज्यूस की फळ?

बरेच लोक असा विचार करतात की, फळांचा ज्यूस प्यायल्याने त्यांना जास्त फायदा होतो. काही लोक तर फळं खाण्याचा कंटाळा येतात म्हणून ज्यूस पितात. पण असं केल्याने जास्त फायदा नाही तर नुकसान होतं. कारण फळांची सगळी शक्ती ही फळांच्या बारीक झालेल्या भागात राहते. ज्यूसमध्ये केवळ लिक्विड शुगर आणि फ्रुक्टोज असतं. जास्त काळ तुम्ही केवळ ज्यूस पित असाल तर डायबिटीसच्या रूग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Best way, time to eat fruits for avoiding blood sugar spikes.

Web Summary : Eating fruits correctly, including the peel if edible, is crucial. Avoid consuming fruits alone, especially on an empty stomach, to prevent glucose spikes. Combining fruits with nuts or yogurt is recommended. Fruit juice lacks fiber, making whole fruits a healthier option.
टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स