lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > Eid Special: शीरखुर्मा करताय? हा शाही पदार्थ करण्याची घ्या कमाल खास रेसिपी, खाऊन म्हणाल ..अहाहा..

Eid Special: शीरखुर्मा करताय? हा शाही पदार्थ करण्याची घ्या कमाल खास रेसिपी, खाऊन म्हणाल ..अहाहा..

Sheer Khurma Recipe: गरमागरम दूधातून येणारा केशराचा सुवास, साजूक तुपात घोळलेला सुकामेवा आणि शेवया.. यांचा एकत्रित शीरखुर्मा जेव्हा चाखायला मिळतो.. तेव्हा त्याची चव म्हणजे केवळ अवर्णनीय.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2022 05:51 PM2022-04-29T17:51:53+5:302022-04-29T17:53:23+5:30

Sheer Khurma Recipe: गरमागरम दूधातून येणारा केशराचा सुवास, साजूक तुपात घोळलेला सुकामेवा आणि शेवया.. यांचा एकत्रित शीरखुर्मा जेव्हा चाखायला मिळतो.. तेव्हा त्याची चव म्हणजे केवळ अवर्णनीय.. 

Eid Special: Food And Recipe: Traditional sheer khurma recipe, delicious recipe for the Ramdam Eid | Eid Special: शीरखुर्मा करताय? हा शाही पदार्थ करण्याची घ्या कमाल खास रेसिपी, खाऊन म्हणाल ..अहाहा..

Eid Special: शीरखुर्मा करताय? हा शाही पदार्थ करण्याची घ्या कमाल खास रेसिपी, खाऊन म्हणाल ..अहाहा..

Highlightsशीरखुर्मा रेसिपी!! केशर, सुकामेवा, तूप आणि शेवया.. रसनातृप्ती करणारा शाही पदार्थ

ईदच्या दिवशी चाखायला मिळणारा शीरखुर्मा आपण हातात येताच चटकन फस्त करतो.. पण तो करण्यासाठी घरातल्या सगळ्यांनी मागचे ४ ते ५ दिवस भरपूर मेहनत घेतलेली असते. दूध आटवायचे आणि त्यात ड्रायफ्रुट्स, शेवया टाकायच्या.. त्यात काय एवढं.. असा विचार करत असाल तर जरा थांबा.. कारण वरवर वाटते तेवढी शीरखुर्मा रेसिपी (Ramdam Eid special sheer khurma) अजिबातच सोपी आणि झटपट होणारी नाही. जेव्हा सगळं घर एकत्र येतं आणि त्या कामी हातभार लावतं, तेव्हाच तर तयार होतो चवदार शीरखुर्मा..

 

शीरखुर्मा बनविण्याची ही पारंपरिक रेसिपी ( Traditional sheer khurma recipe) औरंगाबाद येथील ज्येष्ठ इतिहास संशोधक दुलारी कुरेशी (Dulari Qureshi) यांनी लोकमत सखीशी बोलताना सांगितली आहे. त्या म्हणाल्या की बदाम, काजू, मनुका, पिस्ते, खजूर, शेवया, खोबरे, चारोळ्या, अक्रोड असा सगळाच लवाजमा शीरखुर्मा तयार करण्यासाठी सज्ज ठेवावा लागतो. ईदच्या साधारण १५ ते २० दिवस आधीच सगळा सुकामेवा (dry fruits) आणि शेवया (sevayya) आणल्या जातात. पण शीरखुर्मा बनविण्याची प्रत्यक्ष तयारी मात्र ईदच्या ३ ते ४ दिवस आधीपासून सुरू होते. आपल्याकडे साधारण त्यादिवशी किती लोक येणार, आपण घरची मंडळी किती असा सगळा हिशेब करून किती लीटर दुधाचा शीरखुर्मा करायचा, हे ठरवल्या जातं. 

 

मग त्यानुसार किती ड्रायफ्रुट्स आणि शेवया लागतात हे ठरवायचं. त्यादिवशी एका घरी साधारण १० ते १५ लीटरचा शीरखुर्मा केला जातो. ज्यांच्याकडे येणारे पाहुणे अधिक त्यांचा शीरखुर्मा तर जवळपास २५ ते ३० लीटरच्या घरातही जातो. मग आता त्यानुसार किती सुकामेवा लागणार हे ठरवले जाते. हा सगळा सुकामेवा बारीक चिरून ठेवणे हे सगळ्यात अवघड आणि वेळखाऊ काम. त्यामुळेच तर जेव्हा घरातले सगळेच या कामाला भिडतात आणि पटापट हात चालू लागतात, तेव्हाच तयारीला वेग येतो.

 

सुकामेव्यापैकी बदाम पाण्यात भिजवले जातात किंवा उकळून घेतले जातात. त्यानंतर त्याची सालं काढून टाकायची आणि त्याचे उभे उभे काप करायचे. काजू, पिस्ते हे देखील काही वेळ पाण्यात भिजवून ठेवायचे. मऊ पडले की मग त्यांचे काप करायचे. चारोळ्या, खोबरे देखील पाण्यात भिजवायचे. त्यांच्यावरचं आवरण काढून टाकायचं. चारोळ्या तशाच ठेवायच्या आणि खोबरं मात्र किसून घ्यायचं. खजूर, मनुका यांचेही उभे उभे काप करायचे. 

 

सगळा सुकामेवा कापून झाला की एका कढईत भरपूर साजूक तुप टाकायचं आणि त्याच्यात सगळा चिरलेला सुकामेवा मंच आचेवर सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचा. त्यानंतर त्यात शेवया टाकायच्या आणि त्यादेखील परतून छान लालसर होऊस्तर परतून घ्यायच्या. त्यानंतर एकीकडे दूध आटवत ठेवायचं. खूप बासुंदी एवढं जास्त दूध आटवायचं नसलं तरी त्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत ते आटवावं. एका वाटीत थोडंसं दूध आणि त्यात केशराच्या काड्या आधीपासूनच टाकून ठेवायच्या. आपलं दूध आटलं की त्यात साखर, तळलेला सुकामेवा आणि केशराचं दूध टाका. सर्व्ह करताना बाऊलमध्ये आधी शेवया टाका आणि त्यानंतर त्यावर सुकामेव्याचं दूध टाका. असा हा खमंग, चवदार शीरखुर्मा एकदा नक्कीच खाऊन बघा.. 

image credit- cookwithmanali

Web Title: Eid Special: Food And Recipe: Traditional sheer khurma recipe, delicious recipe for the Ramdam Eid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.