Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > चांगलं लागतं - हेल्दी आहे म्हणून बीट कच्चं खाणं पडेल महागात, पाहा काय असते बीट खाण्याची योग्य पद्धत

चांगलं लागतं - हेल्दी आहे म्हणून बीट कच्चं खाणं पडेल महागात, पाहा काय असते बीट खाण्याची योग्य पद्धत

How to Eat Beetroot : उन्हाळ्यातही बीट खाणं खूप फायदेशीर ठरतं. कारण यात पाणी भरपूर असतं, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते. पण बीट खाण्याची योग्य पद्धत माहिती असावी.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 10:27 IST2026-03-14T10:26:04+5:302026-03-14T10:27:53+5:30

How to Eat Beetroot : उन्हाळ्यातही बीट खाणं खूप फायदेशीर ठरतं. कारण यात पाणी भरपूर असतं, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते. पण बीट खाण्याची योग्य पद्धत माहिती असावी.

Eating raw beetroot can harm gut health, know what is the correct way to eat beetroot | चांगलं लागतं - हेल्दी आहे म्हणून बीट कच्चं खाणं पडेल महागात, पाहा काय असते बीट खाण्याची योग्य पद्धत

चांगलं लागतं - हेल्दी आहे म्हणून बीट कच्चं खाणं पडेल महागात, पाहा काय असते बीट खाण्याची योग्य पद्धत

How to Eat Beetroot : बीट हे एक फार फायदेशीर आणि टेस्ट असं कंदमूळ मानलं जातं. अनेक हेल्थ एक्सपर्ट नियमितपणे बीट खा असं सांगतात. कारण यातून शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. भरपूर लोक हल्ली आधीपेक्षा जास्त बीट खाऊ लागले आहेत. जेवणासोबत कच्चं बीट खाल्लं जातं, तर काही लोक याचा ज्यूस पितात. इतकंच नाही तर बिटाचे पराठे आणि इतरही अनेक डिश लोक आवडीने खातात. पण सामान्यपणे बघायला मिळतं की, जास्तीत जास्त लोक जेवणासोबत कच्चं बीट खातात.

उन्हाळ्यातही बीट खाणं खूप फायदेशीर ठरतं. कारण यात पाणी भरपूर असतं, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते. पण बीट खाण्याची योग्य पद्धत अनेकांना माहीत नसते, ज्यामुळे फायदे मिळण्याऐवजी नुकसानही होऊ शकतं. अशात बीट खाण्याची योग्य पद्धत काय आणि ते खाल्ल्याने काय समस्या होऊ शकतात हे जाणून घेऊया. 

कच्चं बीट खाल्ल्याने काय होतं? 

तब्येत चांगली ठेवण्यासाठी आणि पोषक तत्व मिळवण्यासाठी बरेच लोक न विसरता जेवणासोबत बीट खातात. आपण पाहिलं असेल की, जेवणासोबत बीट लोक कच्चं खातात. कदाचित आपणही तेच करत असाल. यात काहीच वाद नाही की, बिटातून भरपूर पोषण मिळतं. पण बीट खाण्याची ही पद्धत चुकीची असल्याचं हेल्थ एक्सपर्ट सांगतात. कारण कच्चं बीट खाल्ल्याने गट हेल्थचं बरचसं नुकसान होतं. जर आपल्याला पोटातं काही बिघाड होऊ नये असं वाटत असेल तर कच्चं बीट खाणं टाळलं पाहिजे. कच्चं बीट खाल्ल्याने पोट फुगणे, गॅस किंवा जुलाब अशा समस्या समस्या होऊ शकतात.

कुणासाठी जास्त घातक? 

बिटामध्ये ऑक्सलेटचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास असलेल्यांनी कच्चं बीट चुकूनही खाऊ नये असं हेल्थ एक्सपर्ट सांगत असतात. कारण हे ऑक्सलेट तत्वच कॅल्शिअमसोबत मिळून किडनीमध्ये स्टोन तयार करण्यास कारणीभूत ठरतं. बीट हे एक कंदमूळ आहे आणि जर आपण ते कच्चं खाल्लं तर मातीतील कीटाणू किंवा नुकसानकारक बॅक्टेरिया पोटात जाऊन तब्येत बिघडवू शकतात. 

मग कसं खावं बीट? 

बीट नियमितपणे बीट खाल्लंच पाहिजे. पण ते खाण्याची योग्य पद्धत जाणून घेणं महत्वाचं आहे. बीट नेहमी उकळून किंवा थोडं वाफवून खाऊ शकता. बिटाचे पराठेही खाऊ शकता. फक्त कच्चं खाऊ नये. तसेच उपाशीपोटी बीट खाऊ नये. याचा उलट परिणाम होऊ शकतो. तसेच बीट हे कमी प्रमाणातच खावं. 

बिटातील पोषक तत्व

बिटामध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. यात व्हिटामिन्स, मिनरल्स, फायटोन्‍युट्रिएंट्स, डायटरी फायबर आणि नायट्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात. बिटामध्ये मॅगनीज, पोटॅशिअम, आयर्न, फोलेट, व्हिटामिन ए, व्हिटामिन बी आणि व्हिटामिन सी भरपूर असतं. बीट खाल्ल्याने ब्लड प्रेशर कमी ठेवण्यास मदत होते आणि ते हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानलं जातं. तसेच हे Anemia कमी करण्यासही मदत करू शकते. यामध्ये कॅलरी कमी आणि पोषक घटक जास्त असल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही बीट उपयुक्त ठरतं.

Web Title : कच्चा चुकंदर हो सकता है हानिकारक: खाने का सही तरीका जानें

Web Summary : कच्चा चुकंदर खाने से पेट की समस्या और किडनी स्टोन हो सकते हैं। स्वास्थ्य विशेषज्ञ इसे उबालकर या भाप में पकाकर खाने की सलाह देते हैं। सही और सीमित मात्रा में खाने से चुकंदर पौष्टिक होता है, जो रक्तचाप और एनीमिया में सहायक होता है।

Web Title : Raw Beetroot Can Be Harmful: Know the Right Way to Eat

Web Summary : Eating raw beetroot can cause gut issues and kidney stones. Health experts recommend boiling or steaming it instead. Beetroot is nutritious, aiding blood pressure and anemia when consumed correctly and in moderation.