त्वचा सुंदर, चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी फक्त बाहेरुन स्किनकेअर पुरेसं नसतं, तर आतूनही योग्य पोषण मिळणं गरजेचं असतं. म्हणूनच Eat Your Skincare ही संकल्पना खूप लोकप्रिय होत आहे. विविध प्रकारच्या रेसिपी आता लोकं करतात. (Eat Your Skincare: If you want to look beautiful, eat 'this' jelly, easy to make and tasty )त्यापैकीच एक प्रसिद्ध रेसिपी म्हणजे गाजर, बीट, संत्री, लिंबू आणि डाळिंब यांसारख्या पोषक घटकांपासून तयार केलेली जेली ही त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरते. लहान मुलांनाही चॉकलेटऐवजी देता येते.
ही जेली तयार करण्यासाठी सर्वप्रथम गाजर आणि बीट स्वच्छ धुऊन त्यांचे छोटे तुकडे करून घ्या. त्यानंतर हे तुकडे थोड्या पाण्यात शिजवून मऊ करून घ्या आणि मिक्सरमध्ये फिरवून त्याचा स्मूथ पल्प तयार करा. आता संत्र्याचा रस आणि डाळिंब्याचे दाणे मिक्सरमध्ये फिरवून त्यांचा रस काढून घ्या. हे सर्व रस एकत्र करून गाळून घ्या, जेणेकरून मिश्रण एकसारखं होईल. चवीनुसार थोडासा लिंबाचा रस आणि हवे असल्यास मध किंवा गूळ घालू शकता.
आता एका भांड्यात थोडं पाणी घेऊन त्यात अगर-अगर घालून ते पूर्णपणे विरघळेपर्यंत गरम करा. अगर-अगर नीट वितळल्यावर त्यात तयार केलेलं फळांचे मिश्रण घाला आणि हलक्या आचेवर एक-दोन मिनिटं ढवळा. हे मिश्रण साच्यात किंवा बाऊलमध्ये ओतून थंड होऊ द्या आणि नंतर फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. काही वेळातच तुमची हेल्दी जेली तयार होईल.
या जेलीचे फायदे खूपच महत्त्वाचे आहेत. गाजर आणि बीटमध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स आणि व्हिटीमिन्स त्वचेला नैसर्गिक चमक देतात आणि त्वचा तजेलदार ठेवतात. संत्री आणि लिंबामधील व्हिटामिन सी कोलेजन तयार होण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा टवटवीत आणि तरुण दिसते. डाळिंबामध्ये असलेले घटक त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि त्वचेला आतून पोषण देतात. ही जेली नियमित खाल्ल्यास त्वचेचा कोरडेपणा कमी होतो, पिंपल्स आणि डाग कमी होण्यास मदत होते आणि त्वचा नैसर्गिकरीत्या ग्लोइंग दिसू लागते. शिवाय ही जेली पचायलाही हलकी असल्यामुळे शरीरासाठीही फायदेशीर ठरते.
Web Summary : This jelly, made with carrots, beets, oranges, and pomegranate, nourishes skin from within. Rich in antioxidants and Vitamin C, it promotes a natural glow, reduces dryness, and helps diminish blemishes. It's also easy to digest.
Web Summary : गाजर, चुकंदर, संतरे और अनार से बनी यह जेली त्वचा को अंदर से पोषण देती है। एंटीऑक्सिडेंट और विटामिन सी से भरपूर, यह प्राकृतिक चमक को बढ़ावा देता है, रूखापन कम करता है और दाग-धब्बों को कम करने में मदद करता है। यह पचाने में भी आसान है।