भारतामध्ये जेवणानंतर पान, बडीशेप खायची पद्धत आहे. तसेच मुखवास हा प्रकार फार लोकप्रिय आहे. चविष्ट सुगंधी मुखवास विकत मिळतात. (Eat this special Mukhwas every day after meals, your digestion will be good)मात्र घरी पौष्टिक मुखवास करता येतो. चवीला मस्त लागतो. पचनासाठी फार फायदेशीर ठरतो. तसेच आरोग्यासाठी उपयुक्त असणारे पदार्थच वापरायचे. (Eat this special Mukhwas every day after meals, your digestion will be good)पाहा अगदी सोपी रेसिपी.
साहित्य
काळ्या मनुका, खडीसाखर, बडीशेप, काळे तीळ, धणे, सुंठ पूड, वेलची पूड, गुलाबाच्या पाकळ्या, भोपळ्याच्या बिया, जवस, पपईच्या बिया, ओवा, जिरे, सुकं खोबरं
कृती
१. एक कढई तापत ठेवा. त्यामध्ये तेल पाणी काही घालू नका. कढई जरा तापल्यावर त्यामध्ये चार ते पाच चमचे सुकं खोबरं घाला. व्यवस्थित परतून घ्या. खोबऱ्याचा रंग बदलून ते जरा कुरकुरीत होईल मग एका ताटलीमध्ये काढून घ्या. त्याच कढईमध्ये अर्धी वाटी बडीशेप घ्या. मस्त खमंग परता. नंतर एका ताटलीमध्ये काढून गार करत ठेवा.
२. कढईमध्ये काळे तीळ घ्या. चार ते पाच चमचे तीळ वापरा. त्यामध्ये तेवढेच धणे घाला. दोन्ही पदार्थ छान परतून घ्या. नंतर ते ही ताटलीमध्ये काढा. कढईमध्ये भोपळ्याच्या बिया, पपईच्या बिया, ओवा अगदी काही मिनिटे परता आणि गार करत ठेवा.
३. शेवटी जवस आणि जिरे परतून घ्या. सात ते आठ चमचे जवस वापरा. तेवढंच जिरं वापरा. मस्त खमंग परतून घ्या. नंतर त्यामध्ये सगळे परतलेले पदार्थ पुन्हा टाका आणि एकदा परतून घ्या. सगळं एकत्र परतून झाल्यावर मिश्रण गार होऊ द्या.
४. एका फडक्यामध्ये सारे गार झालेले मिश्रण घ्या. त्यामध्ये थोडी खडीसाखर घाला. तसेच त्यामध्ये वेलची पूड घाला आणि सुंठ पूडही घाला. सगळं मिश्रण फडक्यामध्ये नीट बंद करा आणि मग त्यावर खलबत्ता किंवा काही तरी जड वस्तू ठेवा. जरा ठेचून घ्या. जर कुटणी खलबत्ता घरात असेल तर त्याचा वापर करा. मिक्सर वापरला तर सगळा भुगा होऊन जाईल. जरा सगळे पदार्थ ठेचले गेल्यावर एका डब्यामध्ये काढून घ्या. शेवटी त्यामध्ये गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या घाला तसेच काळ्या मनुका घाला.
५. तुम्हाला इतरही मुखवासाचे काही साहित्य त्यामध्ये घालायचे असेल तर तेही वापरु शकता.