चटणी हा पदार्थ अनेक प्रकारे केला जातो. विविध पदार्थांसोबत वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी खाल्या जातात. (Eat the tangy onion-peanut chutney, it's not spicy but it will bring a taste to your mouth.)मात्र ही अशी कांदा व शेंगदाण्याची चटणी सगळ्या पदार्थांसोबत छान लागते. अगदी भातीशी खाल्ली तरी सुंदर चव लागते. पाहा सोपी रेसिपी.
साहित्य
शेंगदाणे, कांदा, तेल, उडदाची डाळ, लसूण, हिरवी मिरची, मोहरी, कडीपत्ता, काश्मीरी लाल मिरची, आलं, मीठ, चिंच, पाणी, हिंग
कृती
१. एका कढईत थोडे तेल घ्यायचे. तेल जरा तापले की त्यात शेंगदाणे घालायचे आणि छान परतून घ्यायचे. शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत परतायचे. सालं काढून परता किंवा सालांसकट परता. सालं काढून घेतली तर चव जास्त छान लागते. कचकच लागत नाही. एका वाटीत थोडी उडदाची डाळ भिजत घालायची.
२. शेंगदाणे परतून झाल्यावर त्यात कढईत छान लांब लांब चिरलेला कांदा घालायचा. कांदा परतून घ्यायचा. मस्त गुलाबी परतायचा. कांदाही काढून घ्यायचा आणि गार करत ठेवायचा.
३. कढईत थोडे तेल घ्यायचे आणि त्यावर हिरवी मिरची परतायची. चिंचेच्या बिया काढायच्या आणि चिंचही कढईत टाकायची. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या आणि त्या ही फोडणीत घालायचा. आल्याचा लहान तुकडा घ्यायचा आणि कढईत घालायचा. सगळं छान परताचं. त्यात भिजवलेली काश्मीरी लाल मिरची घालायची. जास्त घेऊ नका. थोडीच घ्यायची. सगळं गार करत ठेवायचे.
४. पदार्थ गार झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. कांदा, शेंगदाणे, लसूण आणि इतरही सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. त्यात अगदी थोडे पाणी घालायचे. मिक्सरमधून चटणी छान वाटून घ्यायची. चटणी वाटून झाल्यावर एका वाडग्यात काढून घ्यायची.
५. एका फोडणी पात्रात थोडे तेल घ्यायचे. त्यात मोहरी घालायची. मोहरी तडतडली की त्यात कडीपत्याची पाने घालायची. हिंग घालायचे. उडदाची भिजवलेली डाळ घालायची. फोडणी मस्त खमंग तयार करायची मग तयार चटणीत फोडणी ओतायची. मिक्स करायची आणि मग खायला घ्यायची.