उन्हापासून वाचण्यासाठी जेवढे उपाय करता येतील तेवढे आता करायचे. सवयींमध्ये थोडेफार बदल करावेच लागणार. कारण सूर्य दादा आता हळूहळू कोपायला लागले आहेत. (Eat One Cucumber Daily In Summer And See The Results)सूर्य कोपायला आणि पृथ्वी तापायला सुरवात झाली आहेच. आता घामामुळे अंगाला खाज यायला सुरवात होईल. तसेच त्वचा करपून जाईल. या बाहेरील त्रासांवर आपण नक्कीच उपाय करू. (Eat One Cucumber Daily In Summer And See The Results)कारण ते दिसून येतात. पण शरीराच्या आत वाढणाऱ्या उष्णतेचं काय? तिच्याकडे तर अगदी दुर्लक्षच करतो की आपण. पण तसे करून चालणार नाही. काही सोपे-सोपे उपाय असतात ते करत राहायचे. फार काही मोठे करावे लागत नाही.
शरीराला उन्हाळ्यात थंडाव्याची गरज असते. तो थंडावा पंख्याचा वारा नाही तर, थंड अशी फळं देतात. जीभेच्या थंडाव्याचे चोचले तर आपण पुरवतो. (Eat One Cucumber Daily In Summer And See The Results)पण पोटाला हवा असणारा थंडावा मिळतो तो विविध अन्न पदार्थांमधून. एक असा पदार्थ आहे, जो आपल्या घरात नेहमी असतोच. तो पदार्थ म्हणजे काकडी. काकडीची कोशिंबीर आपण आवडीने खातो. पण नुसती काकडी खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. कारण काकडी उष्णता कमी करून शरीर थंड करते.
आपल्याकडे वर्षानुवर्षे काकडीचे पाणी पिण्याची पद्धत आहे. काकडी ही वजन कमी करण्यातही मदत करते.
काकडीमध्ये फायबर भरपूर असते. तसेच खनिजेही भरपूर असतात.
शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी काकडी मदत करते. काकडीमध्ये जीवनसत्त्व के असते.
त्वचेचा कोरडेपणाही काकडीमुळे दूर होतो.
काकडी मूत्रपिंडाचे आरोग्य चांगले ठेवते. त्यामुळे शरीरातील घाण मुत्रावाटे सतत बाहेर जात राहते.
काकडीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. जे शरीराला विविध रोगांपासून वाचवतात.
पेशींच्या आरोग्यासाठीही काकडी चांगली. उन्हाळ्यामध्ये रोज एक काकडी खा. फार उपयुक्त ठरेल. शरीराला उन्हाळ्यात ज्या पोषकतत्वांची गरज असते. ते काकडीतून मिळतात.
काकडीची कोशिंबीर खा. काकडीचा रस काढून तो प्या. काकडीचा रस खुप छान लागतो. बाकी काही नाही तर, रोज एक चांगली गोड काकडी सोलून खा. तेवढे शरीराला दिवसभरासाठी भरपूर झाले.