Join us

चहासोबत खा हनी बटर ब्रेड, ५ मिनिटांत होणारा हा कुरकुरीत पदार्थ चवीला जामच भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2025 16:46 IST

Eat honey butter bread with tea, this crispy dish that can be made in 5 minutes is full of flavor : चहासोबत खाण्यासाठी अगदी मस्त प्रकार. पाच मिनिटांत करा ही रेसिपी.

चहा ब्रेड आपण अगदी आवडीने खातो. बरेचदा नाश्त्याला असा ब्रेड चहा खाल्ला जातो. (Eat honey butter bread with tea, this crispy dish that can be made in 5 minutes is full of flavor)संध्याकाळीही चहासोबत काही तरी हवे म्हणून मग परतलेला ब्रेड किंवा नुसताच ब्रेड चांगला लागतो. ब्रेडचे विविध पदार्थ आपण करतो. गोड, तिखट असे अनेक पदार्थ करता येतात. मात्र असा ब्रेड तुम्ही कधीही खाल्ला नसेल. पाहा अगदी सोपी रेसिपी. हनी बटर ब्रेड. करायला सोपी आणि पाच मिनिटात होणारी ही रेसिपी नक्की करा. 

साहित्यब्रेड, बटर, लोणी, मध, साखर 

कृती१. अख्खा ब्रेड मिळतो तो विकत आणा. बेकरीमध्ये मस्त ताजा न कापलेला ब्रेड आरामात मिळेल. ब्रेड घ्यायचा जरा जाड ठेवायचा जास्त जाड नाही. कपात बुडवता येईल एवढाच ठेवायचा.(Eat honey butter bread with tea, this crispy dish that can be made in 5 minutes is full of flavor) ब्रेडला मधोमध कापायचे. दोन तुकडे पाडू नका. फक्त आत लोणी भरता येईल एवढाच कापायचा. ब्रेडच्या मध्ये लोणी भरायचे. 

२. एका पातेल्यात पातळ केलेले बटर घ्यायचे. त्यात थोडी साखर घालायची. पिठीसाखर घेतली तरी चालेल. हा पदार्थ करण्यासाठी खास ब्राऊन शुगर वापरली जाते. ती जर आवडत असेल तर मग ब्राउन शुगरच घ्या. पातळ केलेल्या बटरमध्ये साखर घातल्यावर त्यात थोडे मध घालायचे. सगळे पदार्थ छान फेटायचे. मिश्रण एकजीव करुन घ्यायचे. मग ब्रेडला सगळ्या बाजूंनी ते मिश्रण लावायचे. 

३. ओव्हन असेल तर त्यात टोस्ट करुन घ्यायचा. नसेल तर एक पॅन गॅसवर ठेवा जरा तापला की गॅस अगदी कमी करुन ठेवा आणि त्यावर ब्रेड पूर्ण ब्राउन होईपर्यंत परतून घ्या. एक बाजू छान कुरकुरीत झाली की ब्रेड उलटायचा आणि दुसरी बाजू परतायची. ब्रेड दोन्ही बाजूंनी मस्त कुरकुरीत होईल. मग काढून घ्यायचा. चहात बुडवून खा. किंवा तसाच खा. चवीला मस्त लागतो.   

४. अख्खा ब्रेड जर मिळत नसेल तर ब्रेडच्या दोन तुकड्यांना लोण्याने चिकटवा आणि मग बाजूने मध व बटरचे मिश्रण लावा. छान परता असे केल्यावरही ब्रेड चविष्टच लागतो. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.