पालकाची अशी भाजी कदाचित कधी खाल्ली नसेल. करायला जेवढी सोपी चवीला तेवढीच भारी. (Eat Dahi Palak - you'll fall in love with spinach! The taste is awesome )गरमागरम भातासोबत मस्त लागते. मात्र भाकरीशीही खाऊ शकता. अजिबात तेल वापरायचे नाही. चमचाभर तुपात केलेली ही भाजी पौष्टिकही आहे. पाहा कशी करायची.
साहित्य
पालक, दही, नारळ, हिरवी मिरची, जिरं, पाणी, मीठ, तूप, उडदाची डाळ, मोहरी, लाल मिरची, कडीपत्ता
कृती
१. पालकाची मस्त ताजी जुडी आणायची. छान निवडायची. पालकाची पाने धुवायची. या रेसिपीमध्ये आपण पालक उकळत नाही. त्यामुळे धुताना काळजी घ्यायची. (Eat Dahi Palak - you'll fall in love with spinach! The taste is awesome )पालक पटकन स्वच्छ होत नाही. पालकाची पाने छान धुतल्यावर बारीक चिरायची. लांब लांब चिरले तरी चालेल.
२. हिरव्या मिरचीचे तुकडे करुन घ्यायचे. उडदाची डाळ भिजव घालायची. लाल मिरचीचे तुकडे करायचे. छान ताजा नारळ घ्यायचा. नारळ खवायचा किंवा नारळाचे तुकडे करायचे. दह्यात थोडे पाणी घालायचे अगदी पातळ ताक करु नका. जरा घट्टच ठेवा. दही पाणी घालून फेटायचे.
३. एका मिक्सरच्या भांड्यात नारळाचे तुकडे घ्यायचे. त्यात हिरवी मिरची घालायची. जिरे घालायचे आणि थोडे पाणी घालायचे. मस्त वाटण तयार करुन घ्यायचे. नारळ व्यवस्थित वाटला जाईल याची काळजी घ्यायची.
४. एका पॅनमध्ये पालक घ्यायचा त्यात थोडे पाणी घालायचे. पालक छान वाफवून घ्यायचा. किमान पाच ते दहा मिनिटे झाकून ठेवायचा. पाणी आटू द्यायचे पाणी कमीच घ्यायचे. पालक मोकळा राहीला पाहिजे. पालक शिजल्यावर त्यात नारळाचे वाटण घालायचे. छान ढवळायचे. एकजीव करायचे आणि मग झाकून ठेवायचे. एक वाफ काढायची. त्यात चवी पुरते मीठ घालायचे आणि ढवळायचे.
५. पालक व वाटण छान शिजल्यावर गॅस बंद कारायचा आणि त्यात दही घालायचे. छान ढवळायचे. जरा घट्ट होईपर्यंत ढवळायचे.
६. एका फोडणी पात्रात चमचाभर तूप घ्यायचे. त्यात भिजवलेली उडदाची डाळ घालायची. पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचे. मगच तुपात डाळ घालायची. डाळ जरा परतली गेली की त्यात मोहरी घालायची आणि तडतडू द्यायची. मोहरी तडतडल्यावर त्यात कडीपत्ता घालायचा. लाल मिरचीचे तुकडे घालायचे. जिरे घालायची. फोडणी खमंग झाल्यावर दही पालकावर ओतायची. मग ढवळायची.