Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > एका घासात एक समोसा खा, पावसाळी सेलिब्रेशन करा जोरात

एका घासात एक समोसा खा, पावसाळी सेलिब्रेशन करा जोरात

Eat a samosa in one bite, celebrate the monsoon in style : झटपट करा मिनी समोसा. पावसाळ्यात गरमागरम खायला मिळाल्यावर सगळेच होतील खुष.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2025 12:41 IST2025-06-09T12:39:29+5:302025-06-09T12:41:31+5:30

Eat a samosa in one bite, celebrate the monsoon in style : झटपट करा मिनी समोसा. पावसाळ्यात गरमागरम खायला मिळाल्यावर सगळेच होतील खुष.

Eat a samosa in one bite, celebrate the monsoon in style | एका घासात एक समोसा खा, पावसाळी सेलिब्रेशन करा जोरात

एका घासात एक समोसा खा, पावसाळी सेलिब्रेशन करा जोरात

समोसा घरी तयार करायचा म्हणजे फार कष्ट घ्यावे लागतात. मात्र हे मिनी समोसे अगदी झटपट तयार होतात. (Eat a samosa in one bite, celebrate the monsoon in style)पाहा अगदी सोपी रेसिपी.  

साहित्य
गव्हाचे पीठ, ओवा, मीठ, तेल, हिरवी मिरची, आलं, जिरे, हळद, जिरे पूड, धणे पूड, लाल मिरची, चाट मसाला, बटाटा, गरम मसाला, मटार

कृती
१. एका कुकरमध्ये बटाटे उकडायचे. बटाटे उकडून झाल्यावर सोलायचे आणि कुसकरुन घ्यायचे. व्यवस्थित कुसकरा त्यात तुकडे राहणार नाहीत याची काळजी घ्या. बटाटा कुसकरुन झाल्यावर एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवा आणि मटारचे दाणे उकळून घ्या. मटार उकळल्यावर त्याचे पाणी काढून टाका. मटार जरा गार आणि कोरडे होऊ द्या. 

२. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. आलं किसून घ्यायचं. परातीत गव्हाचे पीठ घ्या. त्यात थोडे मीठ घाला आणि हातावर मळून ओवा घाला. चार ते पाच चमचे तेल गरम करायचे. गरम तेल पीठात घालायचे. पीठ हाताने छान एकजीव करायचे मग थोडे थोडे पाणी ओतून पीठ मळून घ्यायचे. जरा घट्ट पीठ मळा जास्त सैल नको. 

३. एका कढईत तेल घ्या. तेल जरा गरम झाल्यावर त्यात जिरे घाला. जिरे छान फुलल्यावर हिरव्या मिरचीचे तुकडे घाला आणि किसलेले आले घालून परतून घ्या. परतल्यावर मग त्यात मटारचे दाणे घाला. मटार जरा परतून घ्यायचे. मटार परतल्यावर कुसकरलेला बटाटा त्यात घालायचा. त्यात चवी पुरते मीठ घालायचे. चमचाभर हळद घालायची. चमचाभर जिरे पूड घाला. तसेच धणे पूड घाला. चवीनुसार चाट मसाला घाला आणि लाल तिखटही घालायचे. गरम मसाला घालून सगळं छान परतून घ्या. सगळे पदार्थ एकजीव झाले आणि खमंग वास सुटल्यावर गॅस बंद करा. 

४. पीठाचे गोळे तयार करा. मोठी आणि जरा मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची. त्याचे त्रिकोणी काप करायचे त्यात तयार सारण भरायचे. त्याला समोश्याचा आकार द्यायचा. सगळीकडून नीट बंद करा. 

५. कढईत तेल गरम करायचे. कडक तेलात समोसे सोडायचे आणि परतून घ्यायचे. छान खुसखुशीत परतायचे. चटणी सॉस आवडत्या पदार्थाशी लावून घायचे. पावसाळ्यात असे समोसे खायला नक्कीच मजा येईल.            

Web Title: Eat a samosa in one bite, celebrate the monsoon in style