Lokmat Sakhi >Food > गारेगार काकडी सॅण्डविच खा आणि फिट व्हा, मोजून ५ मिनिटांत करता येणारी चविष्ट रेसिपी

गारेगार काकडी सॅण्डविच खा आणि फिट व्हा, मोजून ५ मिनिटांत करता येणारी चविष्ट रेसिपी

Eat a crunchy cucumber sandwich and get fit, a delicious recipe that can be made in 5 minutes : हे सॅण्डविच खाणे ठरेल आरोग्यासाठी फायद्याचे. झटपट करा अगदी पौष्टिक रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2025 13:58 IST2025-05-21T13:55:13+5:302025-05-21T13:58:10+5:30

Eat a crunchy cucumber sandwich and get fit, a delicious recipe that can be made in 5 minutes : हे सॅण्डविच खाणे ठरेल आरोग्यासाठी फायद्याचे. झटपट करा अगदी पौष्टिक रेसिपी.

Eat a crunchy cucumber sandwich and get fit, a delicious recipe that can be made in 5 minutes | गारेगार काकडी सॅण्डविच खा आणि फिट व्हा, मोजून ५ मिनिटांत करता येणारी चविष्ट रेसिपी

गारेगार काकडी सॅण्डविच खा आणि फिट व्हा, मोजून ५ मिनिटांत करता येणारी चविष्ट रेसिपी

वजन कमी करताना खायचे पदार्थ बेचवच असायला हवेत असा काही नियम नाही. छान चविष्ट पदार्थही करता येतात. ज्यात काहीही अनहेल्दी नसते. सॅण्डविच हा पदार्थ वजन कमी करण्यासाठी सगळेच खातात. (Eat a crunchy cucumber sandwich and get fit, a delicious recipe that can be made in 5 minutes)मात्र त्याला बटर किंवा इतरही काही पदार्थ भरभरून त्यात घालतो मग त्याची चव तर मस्त लागते मात्र कॅलरीजही वाढतात. पण हे सॅण्डविच तुम्ही बिनधास्त खाऊ शकता. चवीला छान असतेच आणि अगदी कमी सामग्रीत करता येते. ब्रेड ब्राऊन वापरलात तर त्यात कॅलरिज आणखी कमी असतात. नाश्त्यासाठी असे सॅण्डविच नक्की करा. छान गारेगार लागते. गॅस लावायचे झेंगटच नाही. 

साहित्य
काकडी, ब्रेड,  दही, कोथिंबीर, मीठ,  काळी मिरी पूड

कृती
१. काकडीची सालं सोलून घ्यायची. मग काकडीचे पातळ तुकडे करायचे.  काकडीचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवायचे. (Eat a crunchy cucumber sandwich and get fit, a delicious recipe that can be made in 5 minutes)कोथिंबीर छान बारीक चिरुन घ्यायची. दही एका फडक्यात घ्यायचे. घट्ट पिळायचे. त्याचे पाणी काढून टाकायचे. छान ताजे गोड दहीच वापरा. 

२. सुके झालेले दही एका खोलगट भांड्यात घ्यायचे. छान फेटायचे. मऊ होईपर्यंत फेटायचे. फेटून झाल्यावर त्यात कोथिंबीर घालायची. तसेच चमचाभर काळी मिरी पूड घालायची. चवीपुरते मीठ घालायचे. मग थोडे साधे दही घालायचे आणि मिश्रण पन्हा फेटायचे. 

३. ब्रेडची टोकं काढून घ्यायची. वापरली तरी चालेल काढायलाच हवी असे नाही. ब्रेडला तयार केलेले मिश्रण छान लावून घ्यायचे. सगळीकडे स्प्रेड करायचे. चांगला जाड थर लावा. त्यावर काकडीचे गार केलेले तुकडे ठेवायचे. दुसरा ब्रेडचा तुकडा घ्यायचा. त्यालाही मस्त दह्याचे मिश्रण लावायचे. काकडीवर उलटे ठेवायचे. मधोमध कापायचे. दोन किंवा चार तुकडे करायचे.

४. तुम्हाला त्यात चिलीफ्लेक्स घालायचे. असेल तरी घालू शकता. हिरव्या मिरचीचा ठेचा घालू शकता. तसेच ओरेगॉनो घालू शकता. गोडवा आवडत असेल तर थोडे मध घालू शकता. यामध्ये चीज, बटर काहीही वापरावे लागत नाही. त्यामुळे हे हेल्दी आहे तसेच करायला अगदीच सोपे आहे. 

Web Title: Eat a crunchy cucumber sandwich and get fit, a delicious recipe that can be made in 5 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.