Join us

थंडीत इडलीचं पीठ फुगतच नाही? १ सोपी ट्रिक, पीठ फुगेल मस्त, होतील मऊ लुसलुशीत इडल्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2024 15:00 IST

Easy Trick to Ferment Idly Dosa Batter in Winters : थंडीच्या दिवसांत मात्र हवेत गारठा असल्याने पीठ नीट आंबत नाही.

इडली, डोसा, उतप्पा यांसारखे साऊथ इंडियन पदार्थ आपण विकेंडला आवर्जून करतो. पोटभरीचे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आडणारे असल्याने हे पदार्थ आपण आवर्जून करतो. इडली-डोसा करायला सोपे आणि पौष्टीक असल्याने हे पदार्थ पाहुणे आल्यावरही करायला सोपे असतात. इडली किंवा डोशाचं पीठ करायचं म्हणजे डाळ-तांदूळ भिजवायचे. मग ते मिक्सरमधून बारीक करुन पीठ भिजवून ठेवायचे आणि मग ते आंबवायचे. उन्हाळ्याच्या दिवसांत हवेचे तापमान जास्त असल्याने हे पीठ लवकर आंबते. पण थंडीच्या दिवसांत मात्र हवेत गारठा असल्याने पीठ नीट आंबत नाही (Easy Trick to Ferment Idly Dosa Batter in Winters). 

पीठ नीट आंबले नाही तर इडली, डोसा हे पदार्थ छान फुलत नाहीत, पण पीठ आंबले तर ते आरोग्यासाठीही चांगले असते आणि इडल्या छान फुगण्यास मदत होते. मग थंडीत बरेचदा पीठ आंबावे म्हणून ते ओव्हनमध्ये ठेवले जाते. त्यामुळे त्याला ऊब मिळण्यास मदत होते आणि पीठ फुगते. पण घरात ओव्हन नसेल तर काय करायचे असा प्रश्नही अनेकांना पडतो. यासाठीच थंडीच्या दिवसांतही ओव्हनशिवाय पीठ चांगले आंबण्यासाठी सरीता पद्मन यांनी १ सोपी ट्रिक सांगितली आहे. हे ट्रिक कोणती आणि ती कशी करायची पाहूया...

थंडीत पीठ आंबण्यासाठी नेमकं काय करायचं? 

पीठ वाटून घेतल्यानंतर एका पातेल्यात ठेवायचे आणि त्यावर एक झाकण ठेवायचे. गॅस सुरू करुन त्यावर तवा चांगला गरम करायचा. तवा एकदम कडकडीत गरम न करता मध्यम गरम करायचा. त्यावर पीठाचे पातेले ठेवायचे आणि शिवाय वरच्या बाजुने या पातेल्याला जाडसर किंवा उबदार कापडाने गुंडाळून ठेवायचे. यामुळे पातेल्याला दोन्ही बाजुने चांगली ऊब मिळण्यास मदत होते. अशाप्रकारे ऊब देऊन पीठ रात्रभर ठेवल्यास थंडीतही पीठ चांगले फुगण्यास आणि आंबण्यास मदत होते. हा उपाय करणे अतिशय सोपे असून तो आपण सहज करु शकतो. तेव्हा हा उपाय नक्की ट्राय करा. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.