Join us  

थंडीत करायलाच हवे टोमॅटो रस्सम, लालबुंद रसरशीत अस्सल रस्समची ही घ्या परफेक्ट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2023 11:30 AM

Easy Tomato Rasam in Cooker | Quick & Easy Tomato Saar : हिवाळ्यात १० मिनिटात तयार करा, साऊथ इंडियन पद्धतीचा गरमागरम टॉमेटो रस्सम; चव अशी की म्हणाल लाजवाब!

भारतीयांना कोणी रोज डाळ-भात (Daal-Bhaat) दिलं तरी त्यांना कंटाळा येणार नाही. काहींचं डाळ-भात खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही. पण काही वेळेला डाळ-भात खाऊन कंटाळा येतो, भाताबरोबर काहीतरी नवीन खावंसं वाटतं. डाळ भात किंवा खिचडीपेक्षा काही नवीन ट्राय करायची इच्छा होते. तेव्हा आपण पुलाव, बिर्याणी असे पदार्थ तयार करतो. पण खिचडीसोबतही काही तरी तोंडी लावण्यासाठी आपल्याला चटकदार पदार्थ लागतेच.

भाताबरोबर डाळ नको असेल, किंवा कंटाळा आला असेल तर, एकदा साऊथ इंडीयन स्टाईल टॉमेटो रस्सम (Tomato Rassam) तयार करून पाहा. टॉमेटो रस्सम हा पदार्थ चवीला चटकदार असून, तयार करायलाही सोपा आहे (Cooking Tips). भारतातल्या घराघरांमध्ये फक्त नाश्त्यालाच नाही तर दोन्ही वेळच्या जेवणांमध्येही आवडीनं खाल्ले जाते. चला तर मग टॉमेटो रस्सम करण्याची सोपी कृती पाहूयात(Easy Tomato Rasam in Cooker | Quick & Easy Tomato Saar).

साऊथ इंडियन स्टाईल टॉमेटो रस्सम करण्यासाठी लागणारं साहित्य

टॉमेटो

हिरवी मिरची

मीठ

हळद

लाल तिखट

कोथिंबीर

मीठ

हळद

लाल तिखट

तेलाचा एकही थेंब न वापरता करा पोह्याचे मेदू वडे, चमचमीत रेसिपी-वेटलॉससाठीही उपयोगी

काळी मिरी

धणे

लसूण

मोहरी

जिरं

लाल सुकी मिरची

कडीपत्ता

कृती

सर्वप्रथम, ३ लाल भडक टॉमेटो चिरून घ्या. चिरलेले टॉमेटो मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची पेस्ट तयार करा. गॅसवर प्रेशर कुकर गरम करण्यासाठी ठेवा. त्यात टॉंमेटोची पेस्ट आणि एक कप पाणी घालून मिक्स करा. नंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, चिमुटभर हळद, एक चमचा लाल तिखट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. नंतर प्रेशर कुकरचं झाकण लावा, एक शिट्टी आल्यानंतर गॅस बंद करा, व कुकरचं झाकण उघडा.

ना बटाटे उकडण्याची गरज-ना कणिक मळण्याची झंझट, पाहा आलू पराठा करण्याची झटपट कृती

खलबत्त्यात एक टेबलस्पून काळी मिरी, एक टेबलस्पून धणे, ५ ते ७ लसणाच्या पाकळ्या घालून ठेचून घ्या. फोडणीच्या पळीत २ चमचे तेल घाला, नंतर त्यात एक चमचा मोहरी, जिरं, लाल सुक्या मिरच्या, कडीपत्ता आणि तयार मसाल्याचा ठेचा घालून मिक्स करा. तयार फोडणी टॉमेटो रस्सममध्ये ओतून मिक्स करा. अशाप्रकारे साऊथ इंडियन स्टाईल टॉमेटो रस्सम खाण्यासाठी रेडी. आपण टॉमेटो रस्सम डोसा, इडली, अप्पे, वाफाळलेला भात किंवा चपातीसह खाऊन शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स