Lokmat Sakhi >Food > बेसनाचं पोळ खाल्यावर लगेच शाळेची आठवण येईल, पाच मिनिटात होणारी ही रेसिपी आहेच तेवढी खास

बेसनाचं पोळ खाल्यावर लगेच शाळेची आठवण येईल, पाच मिनिटात होणारी ही रेसिपी आहेच तेवढी खास

easy to make recipe, Besan Roti known as Besan pola in Maharashtra, famous recipe for tiffin : बेसन पोळं करायला अगदी सोपं असलं तरी जुन्या दिवसांमध्ये घेऊन जाईल. डब्यासाठी खास रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2025 17:40 IST2025-06-24T17:39:52+5:302025-06-24T17:40:38+5:30

easy to make recipe, Besan Roti known as Besan pola in Maharashtra, famous recipe for tiffin : बेसन पोळं करायला अगदी सोपं असलं तरी जुन्या दिवसांमध्ये घेऊन जाईल. डब्यासाठी खास रेसिपी.

easy to make recipe, Besan Roti known as Besan pola in Maharashtra, famous recipe for tiffin | बेसनाचं पोळ खाल्यावर लगेच शाळेची आठवण येईल, पाच मिनिटात होणारी ही रेसिपी आहेच तेवढी खास

बेसनाचं पोळ खाल्यावर लगेच शाळेची आठवण येईल, पाच मिनिटात होणारी ही रेसिपी आहेच तेवढी खास

लहानपणी तुम्हालाही आई डब्यात बेसनाचं पोळ द्यायची का? काही ठिकाणी बेसन पोळी असेही म्हटले जाते. (easy to make recipe, Besan Roti known as Besan pola in Maharashtra, famous recipe for tiffin )झटपट काही करायचे असेल घाई असेल की घरी हा पोळा केला जायचा. चवीला अगदी मस्त असतो. बेसन पोळ्याच्या अनेक रेसिपी आहेत. एकदा मात्र ही रेसिपी नक्की करुन पाहा. चवीला अगदी भारी आहे. 

साहित्य 
बेसन, तेल, लसूण, हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर, आलं, हळद, लाल तिखट, मीठ, जिरे, मोहरी

कृती
१. भरपूर लसूण घातल्यावर बेसनाचं पोळ किंवा पोळी एकदम मस्त लागते. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या. हिरव्या मिरचीचे तुकडे करुन घ्यायचे. कोथिंबीर निवडायची आणि छान बारीक चिरुन घ्यायची. आल्याचा तुकडा घ्यायचा. हिरवी मिरची, आल्याचा तुकडा आणि लसूण जरा ठेचायचा. पातळ पेस्ट करु नका. फक्त छान ठेचा. 

२. कांदा अगदी बारीक चिरुन घ्यायचा. थोडी कोथिंबीरही घ्यायची. तव्यावर थोडे तेल घालायचे. तेलावर चमचाभर जिरे घालायचे. नंतर मोहरी घालायची. छान तडतडू द्यायची. मोहरी तडतडल्यावर त्यात तयार केलेली लसूण मिरची आणि आल्याची पेस्ट घालायची. परतायची आणि मग बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा गुलाबी परतायचा. कांदा परतून झाल्यावर त्यात कोथिंबीर घालायची. सगळं छान परतून झाल्यावर गॅस बंद करायचा.  

 ३. बेसनाचे पीठ एका खोलगट पातेल्यात घ्यायचे. त्यात पाणी ओतायचे. पातळ असे पीठ तयार करायचे. त्यात गुठळ्या होतात त्या मोडून घ्यायच्या. मस्त पातळ मीठ एकजीव झाल्यावर त्यात तयार केलेला मसाला घालायचा. परतलेला कांदा घातल्यावर त्यात चवी पुरते मीठ घालायचे. हळद घालायची. तसेच लाल तिखटही घालायचे. सगळं छान ढवळा आणि मिक्स करा. 

४. तव्यावर तेल घाला आणि मग त्यावर बेसनाचे पातळ पीठ ओता. गोलाकार ओतायचे. थोड्या वेळाने बाजूने थोडे तेल सोडायचे. एका बाजूने सुटल्यावर पलटून दोन्ही कडून कुरकुरीत करायची. मधे मऊ आणि बाजूला कुरकुरीत अशी मस्त खमंग बेसन पोळी तयार करायला एकदम सोपी आहे.   

Web Title: easy to make recipe, Besan Roti known as Besan pola in Maharashtra, famous recipe for tiffin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.