How to Identify Fake Tur Dal At Home: आजकाल बाजारात मिळणाऱ्या अनेक खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचे दिसून येत आहे. दूध, दही, पनीर, फळे, भाजीपाला ते डाळींपर्यंत अनेक वस्तूंमध्ये घातक रसायने मिसळली जातात, जी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. खासकरून डाळींमध्ये रंग आणि केमिकल्सची भेसळ आढळते. बाजारात खूपच चमकदार आणि असामान्यपणे पिवळी दिसणारी तूर डाळ तुम्ही पाहिली असेल, जी नैसर्गिक नसते.
तूर डाळीत कोणता रंग मिसळला जातो?
तज्ञांच्या मते, तूर डाळ अधिक पिवळी आणि आकर्षक दिसावी म्हणून त्यात मेटानिल यलो नावाचे सिंथेटिक रसायन मिसळले जाते. हा रंग प्रामुख्याने कापड आणि लेदर उद्योगात वापरला जातो आणि तो खाण्यासाठी योग्य नसतो. तरीही काही ठिकाणी डाळ, हळद यांसारख्या पदार्थांमध्ये चमक वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. या रसायनाचे दीर्घकाळ सेवन केल्यास लिव्हर, किडनी आणि पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.
डाळीत भेसळ कशी ओळखावी?
डाळीत रंगाची भेसळ ओळखण्यासाठी एक सोपी पद्धत म्हणजे वॉटर टेस्ट. एका ग्लासमध्ये पाणी घ्या, त्यात थोडी तूर डाळ टाका, काही मिनिटे थांबा जर डाळीत कृत्रिम रंग मिसळलेला असेल, तर पाण्याचा रंग अधिक पिवळा होईल. शुद्ध आणि नैसर्गिक डाळ पाण्यात रंग सोडत नाही.
भेसळयुक्त डाळ खाल्ल्याचे दुष्परिणाम
अशी डाळ नियमित खाल्ल्यास शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.
पोटदुखी, उलटी, गॅस, अपचन
लिव्हर आणि किडनीवर दुष्परिणाम
मुलं आणि वृद्धांमध्ये अधिक गंभीर परिणाम
डाळ खरेदी करताना घ्यायची काळजी
नेहमी विश्वासार्ह दुकानातूनच डाळ खरेदी करा
खूप चमकदार किंवा जास्त पिवळी दिसणारी डाळ टाळा
पॅकेजवर FSSAI मार्क आहे का ते तपासा
घरच्या घरी वेळोवेळी पाण्याची चाचणी करा
Web Summary : Beware of adulterated Tur Dal! Spot fake dal at home using a simple water test. Excessively yellow dal may contain harmful chemicals. Buy from trusted stores and check for the FSSAI mark to protect your health.
Web Summary : सावधान! तुवर दाल में मिलावट हो सकती है! पानी परीक्षण से घर पर नकली दाल पहचानें। अत्यधिक पीली दाल में हानिकारक रसायन हो सकते हैं। स्वास्थ्य की रक्षा के लिए विश्वसनीय दुकानों से खरीदें और FSSAI मार्क की जाँच करें।