सांबार, चटणी (South Indian Food) हे दक्षिण भारतीय पदार्थ सर्वांचेच फेव्हरेट असतात. सांबार फक्त एक नाश्त्याचा पदार्थ नसून जेवणात वेगवेगळ्या पदार्थांसोबत तुम्ही सांबारचा आस्वाद घेऊ शकता (How To Make Sambar). हॉटेलमध्ये मिळतो तसा परफेक्ट सांबार घरी बनत अशी अनेकांची तक्रार असते. अण्णास्टाईलमध्ये परफेक्ट सांबार करायचा तर त्याच्या काही टिप्स लक्षात घ्यायला हव्यात (Sambar in a cooker). यात आंबटपणा, गोडपणा, मसालेदार फ्लेवर असं कॉम्बिनेशन असतं. घरच्याघरी सोप्या पद्धतीनं उड्डपीस्टाईल सांबार कसं करायचं याची रेसिपी पाहूया. (Udupi style sambar in a cooker in 10 minutes Easy Recipe)
डाळ शिजवून घ्या
सगळ्यात आधी तुरीची डाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. डाळ व्यवस्थित धुवून प्रेशर कुकरमध्ये थोडं पाणी आणि हळद घालून उकळवून घ्या. डाळ मऊ झाल्यानंतर सांबारचा बेस तयार होईल आणि क्रिमी टेक्स्चर मिळेल.
फोडणी कशी तयार करावी?
एका छोट्या कढईत एक चमचा मोहोरीचं तेल गरम करा. त्यात अर्धा चमचा मोहोरीचे दाणे घाला. तडका व्यवस्थित दिल्यानंतर यात सुकी लाल मिरची, मेथी दाणे आणि कढीपत्ता घाला. त्यानंतर थोडं हींग घाला. हा तडका संपूर्ण सांबारची चव खास बनवेल.
चपात्या केल्या की लगेच कडक होतात? डब्यात हा एक पदार्थ ठेवा; २ दिवस मऊ राहतील चपात्या
भाज्या शिजवा
नंतर फोडणी देण्यासाठी एक कांदा चिरून घ्या आणि गोल्डन होईपर्यंत तळून घ्या. त्यात टोमॅटो घाला. हळूहळू गाजर, भोपळा, बटाटा, वांगी,भेंडी आणि दूधी यांसारख्या भाज्या घाला. नंतर मीठ घाला भाज्या हलक्या परतवून घ्या. ही प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये करू शकता.
डाळ आणि मसाले
सर्व भाज्या हलक्या शिजल्यानंतर त्यात शिजवलेली डाळ घाला. नंतर गरजेनुसार पाणी घाला जेणेकरून सांबारचा घट्टपणा टिकून राहील. नंतर त्यात चिंचेचं पाणी घाला. नंतर यात १ चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर घाला. २ चमचे सांबार मसाला घाला. ही स्टेप रंग आणि चव येण्यास उपयुक्त ठरते. सांबारचे फ्लेवर्स संतुलित करण्यासाठी त्यात थोडा गूळ घाला.
९० टक्के लोक चहा करताना 'ही' चूक करतात;५ टिप्स -टपरीसारखा घट्ट, फक्कड चहा घरीच करा
ज्यामुळे तिखटपणा कमी होईल परफेक्ट चव येईल नंतर सर्व मसाले व्यवस्थित मिसळून १५ ते २० मिनिटं मंद आचेवर झाकून ठेवा. गॅस बंद करण्याआधी त्यावर कोथिंबीर घाला. गरमागरम रेस्टोरंटस्टाईल सांबार तयार आहे. हा सांबार तुम्ही गरमागरम भात, इडली किंवा डोसा, वड्यासोबत खाऊ शकता.
जर तुम्हाला जास्त आंबटपणा हवा असेल तर चिंचेच पाणी वाढवू शकता. भाज्या आपल्या आवडीनुसार निवडून कमी जास्त करा. गूळ घातल्यानं सांबारची चव आणि फ्लेवर दोन्ही वाढते. सांबार नेहमी मंद आचेवर शिजवा. सांबार सर्व्ह करण्याआधी १० मिनिटं झाकून ठेवा. ज्यामुळे फ्लेवर खूप चांगला येईल.