अक्षय कुमारला खिलाडी नंबर वन असे म्हटले जाते. तो बॉलिवूडमधला सगळ्यात जास्त शिस्तप्रिय मानला जाणारा अभिनेता आहे. वयाच्या ५७ व्या वर्षीही तो प्रचंड फिट आहे. (Easy recipe for making date milk shake just like Akshay Kumar likes)कारण त्याचे रुटीन तो काहीही झाले तरी फॉलो करतोच. योग्य आहार घेण्यापासून झोपेचे चक्र पाळण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी तो नित्य नियमाने पाळतो. अक्षय कुमार व्यायाम करण्याला प्राधान्य देतो. अक्षय कुमार त्याच्या मुलाखतींमध्ये आहाराचे महत्व सांगताना अनेकदा दिसतो. लोकांनी खाण्याच्या सवयी बदलल्या पाहिजेत. साखर खाऊ नये. असे सांगताना बरेच सेलिब्रिटी दिसतात. पण मग साखर नाही खाल्ली याचा अर्थ गोड खाणे सोडायला हवे असा नाही. साखरेशिवायही छान गोड खाता येते. अक्षय कुमारने एका मुलाखतीत त्याचे आवडते मिल्कशेक सांगितले. त्याला खजूर मिल्क शेक आवडतो. सकाळी नाश्त्याबरोबर हा मिल्क शेक तो पितो असे अक्षयने सांगितले. तुम्ही कधी प्यायला आहात का हे मिल्क शेक? नाही तर मग पाहा अक्षयच्या आवडत्या पेयाची रेसिपी.
साहित्यखजूर, दूध, केळ, बदाम
एका माणसानुसार जर प्रमाण घ्यायचे असेल तर मग, चार ते पाच खजूर हवेत. तसेच सात ते आठ बदामही हवेत. दूध एक ग्लास भरून वापरा. मिल्कशेक एकदम पातळ करायचा नाही. म्हणून दूध अति घालू नका. एक केळं चिक्कार झालं. फक्त १० मिनिटांमध्ये हे मिल्क शेक तयार होते.
कृती१. बदाम भिजत घाला. काही तास भिजलेले चालतात. मात्र रात्रभर भिजवलेले बदाम चवीला जास्त चांगले लागतात.
२. खजूराचे तुकडे करून घ्या. त्यामधील बिया काढून टाका.
३. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूराचे तुकडे घ्या. त्यामध्ये भिजवलेले बदाम घाला. सोलायची गरज नाही सालामध्ये पोषण असते. पण सोललेत तरी चालेल.
४. त्यामध्ये दूध ओता. केळ्याचे बारीक तुकडे करा आणि घाला.
५. ते सगळं मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्सर चालू ठेवा. ते जरा घट्ट झाले की मग प्या.