हॉटेलच्या मेन्यूमध्ये हाय डिमांड भाज्यांपैकी अनेक भाज्या घरी करता येतात. काही भाज्या फार लोकप्रिय नसतात तरी त्यांची चव अगदी हटके आणि मस्त असते. (easy recipe for Lasuni Methi, try this recipe )भाजीला लसणाची फोडणी दिल्यावर भाजीची चव एकच नंबर लागते. लसूणी मेथी ही भाजी काही ढब्यांवर पाहायला मिळते. तशीच लसूणी पालकही करता येते. चवीला या भाज्या अप्रतिम असतात. (easy recipe for Lasuni Methi, try this recipe )करायची पद्धतही जरा वेगळी असते. मेथी न आवडणाऱ्यांनाही मेथी आवडायला लागेल एवढी मस्त याची चव आहे. पाहा अगदी सोपी रेसिपी.
साहित्य
मेथी, लसूण, कांदा, जिरे, तेल, डाळं, शेंगदाणे, पांढरे तीळ, पाणी, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं, लाल तिखट, हळद, हिंग, धणे-जिरे पूड
कृती
१. मस्त ताजी मेथीची जुडी घ्या. व्यवस्थित निवडा. मेथी छान बारीक चिरा. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्या. लसूण भरपूर वापरा त्याशिवाय भाजीला मज्जा येणार नाही. टोमॅटो बारीक चिरा त्याच्या बिया काढून घ्या. कांदाही अगदी बारीक चिरुन घ्या. हिरवी मिरची बारीक चिरुन घ्या.
२. एका कढईमध्ये थोडे तेल घ्या. त्यावर डाळं व पांढरे तीळ परतून घ्या. छान खमंग झाले की गार करत ठेवा. गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या त्यात पाणी घाला आणि वाटून घ्या. मस्त घट्ट पेस्ट करा. पातळ नको.
३. एका पॅनमध्ये तेल घ्या. त्यावर जिरे घाला आणि तडतडू द्या. जिरं तडतडल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घाला परतून घ्या. त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. हिंग घाला. कांदा घाला कांदा छान गुलाबी होईस्तोवर परता. कांदा परतल्यावर त्यामध्ये टोमॅटो घाला आणि एक वाफ काढून घ्या.
४. त्यामध्ये मीठ घाला तसेच हळद घाला. आलं घाला. लाल तिखट घाला धणे-जिरे पूड घाला आणि सगळं एकजीव करुन घ्या. त्यामध्ये मेथी घाला आणि एक वाफ काढून घ्या. मग त्यात वाटलेली शेंगदाण्याची पेस्ट घाला सगळं ढवळून घ्या. थोडं पाणी घाला आणि भाजी शिजू द्या. सगळं मस्त एकजीव झाल्यावर भाजी जरा घट्ट होईल.